गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मराठा आरक्षण विरोधी डॉक्टरला केले लक्ष्य; कोल्हापुरात हॉस्पिटलची तोडफोड

कोल्हापूर:मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणारे डॉ. तन्मय व्होरा यांच्या कोल्हापूर येथील सूर्या हॉस्पिटलची आज ‘ मराठा क्रांती मोर्चा ‘च्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यामुळे तिथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तसेच व्होरा यांनी माफी मागितल्यानंतर तणाव निवळला.  एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सूर्या हॉस्पिटलवर धडक दिली. तिथे जाब विचारत हॉस्पिटलच्या नामफलकाची […]

ताज्याघडामोडी

आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार – छगन भुजबळ

मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यांचे सवलतीच्या दरात जूनमध्ये वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच राज्य सरकारने अन्न धान्य मोफत वाटण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मागच्या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय […]

ताज्याघडामोडी

भारतात 70 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण; न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये दावा

नवी दिल्ली – भारतात कोरोनाची लागण आणि त्यातून झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वाद सुरू आहेत. विविध ठिकाणी सरकारी आकडे आणि प्रत्यक्ष आकड्यांमध्ये फरक असल्याचे रिपोर्ट समोर आले. त्यातच आता आपल्या एका रिपोर्टमध्ये न्यूयॉर्क टाइम्सने भारतातील कोरोनाची लागण आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूवर धक्कादायक दावा केला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, देशात कोरोनामुळे 2.69 लोक प्रभावित झाले आहेत. तर 3 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड गाडी जाळण्याचा प्रयत्न, बुलडाण्यात खळबळ

बुलडाणा, 26 मे : या ना त्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर त्यांची 4 चाकी महागडी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. संजय गायकवाड यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी इनोव्हा कार घरासमोर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा गळा आवळून खून

प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने मयताच्या पत्नीच्या मदतीने प्रियकराने गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. अमरावती जिल्ह्यातील ही घटना असून अण्णा उत्तम जाधव (35, रा.बाजारसावंगी, ता. रत्नपूर) यांचा मृतदेह वैजापूर तालुक्यातील गारज शिवारात लोकविकास शुगर मिल्सच्या जागेवर सोमवारी आढळला होता. अण्णाचा खून झाल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने […]

ताज्याघडामोडी

लसीचे दोन्ही डोस घेवूनही एकाच पोलिस ठाण्यातील 8 कर्मचारी बाधित

जिल्ह्यातील सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये आठ पोलीस कोरोनाबधित आढळून आलेले आहेत. या पोलिसांनी कोरोनाची दोन्ही लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस रस्त्यांवर आहेत, मात्र या पोलिसांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. एकाच पोलीस स्टेशन मधील आठ पोलीस कोरोनाबधित झाल्याने पोलीस दलात खळबळ उडवणारी ही बातमी आहे. कोरोना पाॅझिटीव्ह आलेले कर्मचारी यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बनावट कागदपत्रांचा वापर करून जप्त केलेल्या कारची विक्री, आरटीओ अधिकाऱ्यांसह 12 जणांविरोधात गुन्हा

कर्जाचे हप्ते थकल्याने जप्त केलेल्या कारची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन आरटीओ अधिकाऱ्यांसह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात खोटी तक्रार देऊन एपीएमसी पोलिसांचीदेखील फसवणूक करण्यात आली आहे. वाशी आरटीओचे तत्कालीन अधिकारी दशरथ वाघुले, राजेंद्र सावंत […]

ताज्याघडामोडी

शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार होते. सोलापूर जिल्ह्यातील लोकं आंदोलन करणार आहेत, असं समजताच पोलिसांनी गोविंद बागेबाहेर सुरक्षा वाढवली आहे. दोन आंदोलकांना बारामतीत पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आला […]

ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णाच्या उपचाराचे १० लाख रुपये मेडिक्लेम जमा तरीही दीड लाख डिपॉझिट परत देण्यास नकार 

 कोरोनाच्या या संकट काळात रुग्ण आणि रुग्णांची लूट सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. या रुग्णालांना कधी चाप बसणार आणि सर्वसामान्यांची लूट कधी थांबणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णालयाने डिपॉझिट म्हणून घेतलेले पैसे परत करण्याचे नावच घेत नसल्याने त्यांच्या विरोधात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्यात आलं. अर्धनग्न आंदोलन करताच रुग्णालय प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ट्रॅक्टर, वाहने चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश

पुणे, 25 मे : पुणे ग्रामीण पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पुणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांसह अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमधूनही त्यांनी ट्रॅक्टर आणि इतर वाहनांची चोरी केली होती. त्यांच्याकडून 10 ट्रॅक्टरसह 14 चारचाकी, 6 बाईक, गाई आणि चोरीसाठी वापरलं जाणारं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. त्यांनी केलेल्या 21 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी लावला […]