ताज्याघडामोडी

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर टोळक्याचा स्टम्प आणि रॉडने हल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. संदीप देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये संदीप देशपांडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हाताला […]

ताज्याघडामोडी

“निवडून येणारे उमेदवार दिले तर मविआ राज्याच्या निवडणुकीतही जिंकेल” -अजित पवार

परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी आहे. आम्ही मविआ म्हणून या निवडणुकीला सामोरे गेलो. भाजपाचा उमेदवार कसबा पेठेत सातत्याने निवडून येत होता. आधी गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांनी हा मतदारसंघ राखला होता. यावेळी भाजपाच्या विरोधात रवींद्र धंगेकर हा अत्यंत योग्य उमेदवार आम्ही दिला होता. तिथेच आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो असं विरोधी पक्षनेते अजित […]

ताज्याघडामोडी

शाळा सुटली, जेवण केलं, पोहण्यासाठी तलावावर; गाळात रुतून दोन चिमुकल्यांचा करुण अंत

ग्रामीण भागामध्ये विशेषत: गाव खेड्यानजीक पाझर तलाव हे लहानपणापासूनच तिथल्या गावकऱ्यांना काही नवीन नसतात. आजही प्रामुख्याने सातपुड्यासारख्या कुशीत म्हणा किंवा गावाजवळ जाणाऱ्या नद्या या ग्रामीण भागात असतातच. सकाळची शाळा करून घरी परतल्यानंतर १० वर्षीय चिमुकल्यांनी जेवण केलं. त्यानंतर पोहण्याचा मोह झाल्याने दोघेही गाव शिवारातील तलावावर गेले. मात्र, खोल पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही […]

ताज्याघडामोडी

बी.ए.प्रथम वर्षात नापास, १९ वर्षीय विद्यार्थिनीचा टोकाचा निर्णय; शेतात जाऊन…

सध्याच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात मोठी स्पर्धा झाली आहे. एकीकडे वाढलेली बेरोजगारी आणि त्यावर मात करण्यासाठी सुरू असलेली धडपड दिसून येते. मानसिक तणावाखाली असलेला तरुण/तरुणी हाती अपयश येत असल्यामुळे नैराश्यात जात आहेत. त्याचबरोबर कुणाला जर मानसिक त्रास सहन झाला नाही तर ते टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवल्याच्या देखील धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. अशीच एक धक्कादायक […]

ताज्याघडामोडी

११ हजार ४० मतांनी धंगेकर यांचा दणदणीत विजय! भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार

महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. आज कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय मिळवला आहे. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेला हा मतदारसंघ आता मविआने ताब्यात घेतला आहे. 

ताज्याघडामोडी

आजारी चिमुकल्याला दवाखान्यात नेतानाच मृत्यूने गाठलं, भरधाव ट्रकची धडक, आईची मृत्यूशी झुंज

विटांची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने बाईकला जबर धडक दिली. या भीषण अपघातात ४ वर्षांच्या चिमुकल्यासह तिघे जण ठार झाले आहेत, तर एक महिला गंभीर रित्या जखमी झाली. लहानग्याला दवाखान्यात नेत असताना काळाने घाला घातला. ही दुर्घटना काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरीअडगाव आंबेटाकळी रोडवर घडली. बोरीअडगाव येथील हार्दिक रोहित वानखडे हा ४ वर्षीय […]

ताज्याघडामोडी

नमामी चंद्रभागा योजनेअंतर्गत १७ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर

चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य सरकारचे पुढचे पाऊल  भारताची दक्षिण काशी म्हणून लौकिक असणाऱ्या पंढरपूर शहरामध्ये वारीनिमित्त लाखो वारकरी भाविक पंढरीत दाखल होतात. सांप्रदायिक आणि अध्यात्मिक राजधानी असणाऱ्या पंढरपूर मध्ये येणारा वैष्णवांचा मेळा चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जमा होतात.पंढरपूर नगरीच्या जलतीर्थ आख्यायिकेची परंपरा जतन करणारी चंद्रभागा नदी गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषण आणि घाणीचे साम्राज्य यांच्या […]

ताज्याघडामोडी

गुरुवारी पंढरीत ठाकरे समर्थकांकडून शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन

उपनेते,माजी खासदार,आमदार,जेष्ठ पदाधिकारी उपस्थित रहात मार्गदर्शन करणार   गुरुवार दि. 2 मार्च पासून सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून शिवगर्जना अभियानाची सुरुवात करण्यात येणार असून याचा शुभारंभ गुरुवारी पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठ येथे भव्य मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या मेळाव्यात  पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या सोलापूर […]

ताज्याघडामोडी

बैलांना पाणी पाजताना पाय घसरला, मामाकडे शिकणाऱ्या भाच्याचा कालव्यात बुडून मृत्यू

शेतीकामात मामाला मदत म्हणून बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा कालव्यात पाय घसरुन बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील महिंदळे या गावात घडली आहे. मयूर नरेंद्रसिंग ठाकरे (वय २२ वर्ष, रा. गणेशपुरा, ता. साक्री) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयुर हा दहावीपासून महिंदळे येथे असलेल्या त्याच्या मामाकडे शिकण्यासाठी […]

ताज्याघडामोडी

आईने आयुष्य संपवलं, मग दोघी मुली विहिरीजवळ गेल्या अन्… सुन्न करणारी घटना

आईसह दोन मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे अकोले तालुका हादरला आहे. मन्याळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनिता जाधव (वय ४८), प्राजक्ता जाधव (वय २२) आणि शितल जाधव (वय १८) अशी मृतांची नावे आहेत. घडलेल्या प्रकारामुळे गावात शोककळा परसली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मन्याळे गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. […]