ताज्याघडामोडी

बी.ए.प्रथम वर्षात नापास, १९ वर्षीय विद्यार्थिनीचा टोकाचा निर्णय; शेतात जाऊन…

सध्याच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात मोठी स्पर्धा झाली आहे. एकीकडे वाढलेली बेरोजगारी आणि त्यावर मात करण्यासाठी सुरू असलेली धडपड दिसून येते. मानसिक तणावाखाली असलेला तरुण/तरुणी हाती अपयश येत असल्यामुळे नैराश्यात जात आहेत. त्याचबरोबर कुणाला जर मानसिक त्रास सहन झाला नाही तर ते टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवल्याच्या देखील धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यामध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गिरगाव येथील १९ वर्षीय विद्यार्थिनीने बि.ए. प्रथम वर्षात नापास झाल्याने औषध प्राशन केलं असल्याची धक्कादायक घटना घडली. तिच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. परीक्षेत काही विषयांत नापास झाल्यामुळे ती सतत नाराज राहत होती. याच नैराश्यात तिने शेतातील फवारणीचे औषध प्राशन केले आणि त्यात तिचा मृत्यू झाला. समीक्षा राजू नादरे (वय १९), असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे.

दरम्यान, घरातील व्यक्तींना माहिती मिळताच तिला तात्काळ उपचारासाठी नांदेड येथे हलविले. तिच्यावर काही दिवस उपचार सुरू असताना आज तिचा मृत्यू झाला. या घटनेबाबत राजू तुकाराम नाचरे यांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. लेकीच्या जाण्यानं तिच्या कुटुंबावर आणि शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *