कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली अनेक निर्बंध लादले असून अत्यवश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने,आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत.या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने आज गुरुवार दिनांक ३ जून रोजी शहरातील विविध भागात कारवाई करीत ४ दुकानदाराविरोधात भादवि क.188,269प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजच्या […]
Uncategorized
पंढरपुर बस्थानकातून सामान्य प्रवाशांना करता येणार एसटीतून प्रवास
गेल्या जवळपास दोन महिण्यापासुन ठप्प झालेली एसटीची प्रवासी वाहतूक हळूहळू मार्गावर येण्याची चिन्हे असून केवळ अत्यावश्य्क सेवेतील कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्या साठीच केवळ गेल्या जवळपास २ महिन्यापासून एसटी प्रवासी वाहतूक सुरु होती.राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ह्ळूहळू आटोक्यात येत असताना सामान्य प्रवाशासाठी एसटीने वाहुतक सेवा सुरु करावी अशी मागणीही होत होती.याची दखल घेत सोलापूर जिल्ह्यातील […]
कोरोना अपडेट : शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ
पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोणा बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसात दिलासादायक घट होताना दिसून आली होती.परंतु आज २ जून रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण १७५ कोरोना बाधिताची नव्याने नोंद झाली असून यामध्ये पंढरपूर शहर २४ तर ग्रामीण भागात १५१ बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालानुसार शहरातील २ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत […]
कोविडच्या काळात सर्वांनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे – आ. समाधान आवताडे
पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सर्वजण खूप मोठ्या विळख्यात अडकलो आहे त्यामुळे कोरोनाच्या या प्रकोपात सर्वांनी एकमेकांना मदतीसाठी पुढे सरसावले पाहिजे असे आवाहन नूतन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे. पंढरपूर तालुक्यातील गादेगांव येथील कोविड केअर केंद्रास भेट देवून आ. समाधान आवताडे यांनी व्यक्तिगत स्वरूपात अर्थिक मदत केली. त्यावेळी त्यांनी […]
कोरोना अपडेट : आजच्या अहवालाने शहराचे टेन्शन झालेकमी,तर ग्रामीणमधील संख्या वाढतीच
गेल्या काही दिवसात पंढरपुर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असून त्यामुळे शहर व तालुक्यास मोठा दिलासा मिळाला आहे. आज शहरात ९ तर तालुक्यात १५४ कोरोना बाधित नव्याने आढळले आहेत.तर आजच्या अहवालात एकही मृत्यूची नोंद नाही.उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.आजच्या अहवालानूसार शहरातील केवळ ८५ कोरोना बाधित उपचार घेत आहेत तर […]
कोरोना अपडेट : आजच्या अहवालाने शहरास दिलासा तर तालुक्यातील संख्या पुन्हा वाढली
गेल्या काही दिवसात पंढरपुर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असून त्यामुळे शहर व तालुक्यास मोठा दिलासा मिळाला आहे.एकाच दिवशी साडेपाचशें रुग्णांची भर पडल्यानंतर हळू हळू संख्या कमी होत चालली असून आज शहरात १५ तर तालुक्यात १०५ कोरोना बाधित नव्याने आढळले आहेत.तर आजच्या अहवालात एकही मृत्यूची नोंद नाही.उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात […]
गुरसाळे नजीक भीमा नदीतून बोलेरो,टाटा सुमो,ओमनी व्हॅन द्वारे अवैध वाळू उपसा
पंढरपुर तालुक्यातील गुरसाळे येथील भीमा नदीच्या पात्रातून सुमो व व्हॅन च्या माध्यमातून अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना मिळाली असता त्यांनी या बाबत दिलेल्या कारवाईच्या आदेशानुसार गुरसाळे बीटला नेमणूकीस असणारे बीट अंमलदार पो.कॉ.गोरख भराटे, पो. हे.कॉ. नलवडे,पो.ना.भोसले दि.23/05/2021 रोजी पहाटे 03:15 वा.सुमारास गुरसाळे,ता.पंढरपूर येथील भिमानदी पात्रामधील महादेव […]
खाजगी दूध संघांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट
राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणि कोरोना प्रसाराचा गैरफायदा उठवत राज्यातील खाजगी दूध संघाची दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १५ रुपयांच्या आसपास कमी दर देण्यात येत आहे.तर दूध उप्तादकांना प्रतिलिटर किमान २५ रुपये दर देण्यात यावा असे आदेश असताना त्याचेही पालन बहुतांश खाजगी संघाकडून केले जात नाही.हि सरळ सरळ दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक व लूट आहे.तरी अशा खाजगी दूध […]
पंढपुरात ७१ एसटी कामगारांचे लसीकरण
पंढरपूर येथील इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ७१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पार पडले.मागील आठवड्यात पंढरपुर एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष विनय वनारे यांनी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्या बैठकीत पंढरपूर आगारातील एसटी कामगारांना फ्रंट लाईन वर्कर प्रमाणे तातडीने लस मिळावी अशी मागणी केली होती.यावेळी शिवाजी सावंत यांनी आगार प्रमुख श्री सुतार यांच्या समवेत चर्चा करून लसीकरणातील अडचणी […]
कोरोना अपडेट : पंढरपूर शहरात बाधितांची संख्या वाढली तर ग्रामीणला थोडा दिलासा
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात ७७ तर तालुक्याच्या ग्रामीण भागात १५३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर आजच्या अहवालानुसार एकही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही .गेल्या तीन दिवसात शहर व तालुक्यातील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मात्र मोठी घट झाली आहे.आज २३ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सद्या २२२७ कोरोना बाधित उपचार घेत आहेत.











