गेल्या जवळपास दोन महिण्यापासुन ठप्प झालेली एसटीची प्रवासी वाहतूक हळूहळू मार्गावर येण्याची चिन्हे असून केवळ अत्यावश्य्क सेवेतील कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्या साठीच केवळ गेल्या जवळपास २ महिन्यापासून एसटी प्रवासी वाहतूक सुरु होती.राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ह्ळूहळू आटोक्यात येत असताना सामान्य प्रवाशासाठी एसटीने वाहुतक सेवा सुरु करावी अशी मागणीही होत होती.याची दखल घेत सोलापूर जिल्ह्यातील विविध आगारातून एसटी प्रवासी वाहतुकीस १ जून पासून सुरुवात झाली आहे. या बाबत आगार प्रमुखांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार काही ठरविक मार्गावर प्रवासी वाहतूक केली जाणार असून या प्रवासात सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.सुरुवातीला पंढरपुर-सोलापूर,पंढरपुर-पुणे,पंढरपुर-टेम्भूर्णी या मार्गावर सामान्य प्रवाशांना एसटी बससेवेचा लाभ घेता येणार आहे.
