गेल्या काही दिवसात पंढरपुर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असून त्यामुळे शहर व तालुक्यास मोठा दिलासा मिळाला आहे.एकाच दिवशी साडेपाचशें रुग्णांची भर पडल्यानंतर हळू हळू संख्या कमी होत चालली असून आज शहरात १५ तर तालुक्यात १०५ कोरोना बाधित नव्याने आढळले आहेत.तर आजच्या अहवालात एकही मृत्यूची नोंद नाही.उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.आजच्या अहवालानूसार शहरातील केवळ ८६ कोरोना बाधित उपचार घेत आहेत तर ग्रामीण भागातील १८२९ कोरोना बाधित उपचार घेत आहेत.






