Uncategorized

पंढपुरात ७१ एसटी कामगारांचे लसीकरण 

पंढरपूर येथील इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ७१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पार पडले.मागील आठवड्यात पंढरपुर एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष विनय वनारे यांनी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्या बैठकीत पंढरपूर आगारातील एसटी कामगारांना फ्रंट लाईन वर्कर प्रमाणे तातडीने लस मिळावी अशी मागणी केली होती.यावेळी शिवाजी सावंत यांनी आगार प्रमुख श्री सुतार यांच्या समवेत चर्चा करून लसीकरणातील अडचणी जाणून घेतल्या होत्या.त्यावेळी शिवाजी सावंत यांनी थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क करून कामगारांच्या लसीकरणासाठी आग्रह केला होता.या नंतर मंत्री अनिल परब यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याशी संपर्क करून लसीकरणाबाबत सूचना दिल्या होत्या.त्यानंतर २२ मे रोजी ७१ एसटी कामगारांचे लसीकरण करण्यात आले.       

            एसटी कामगारांना लस उपलब्ध करून देण्यासाठी राज्य परिवहन मंत्री माननीय अनिल परब, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्राध्यापक माननीय आमदार तानाजी सावंत,  जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, मा.राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, जिल्हा प्रमुख  संभाजीराजे शिंदे.लक्ष्मीकांत ठोंगे पाटील,सल्लागार प्रमुख जयवंत माने, मा जिल्हा प्रमुख अजय दासरी,उप जिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रवींद्र मुळे यांचे एसटी कामगार सेनेचे पंढरपुर आगार  प्रमुख विनय वनारे, पंढरपूर एसटी आगार सचिव  गणेश पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक, मुकुंद नेहतराव,विभागीय उपाध्यक्ष संजय गंगणे, कार्य अध्यक्ष शशिकांत ताटे, कोषाध्यक्ष बिटु चव्हाण,सहसचिव दीपक इंगोले व लक्ष्मण घाडगे उपाध्यक्ष नितीन घाडगे, संजय ताटे,शफी आत्तार,बंडू भोई यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *