Uncategorized

खाजगी दूध संघांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट

राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणि कोरोना प्रसाराचा गैरफायदा उठवत राज्यातील खाजगी दूध संघाची दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १५ रुपयांच्या आसपास कमी दर देण्यात येत आहे.तर दूध उप्तादकांना प्रतिलिटर किमान २५ रुपये दर देण्यात यावा असे आदेश असताना त्याचेही पालन बहुतांश खाजगी संघाकडून केले जात नाही.हि सरळ सरळ दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक व लूट आहे.तरी अशा खाजगी दूध संघावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने  युवक कार्याध्यक्ष श्रीकांत नलावडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,दुग्धविकास मंत्री आदींकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात दूध उत्पादक शेतकऱ्यांची कशा प्रकारे लूट केली जात आहे पुढील प्रमाणे नमूद केले आहे

कोरोना लॉकडाऊनच्या गंभीर परिस्थितीमुळे पशुधन वाचविण्यासाठी व दूध उत्पादक शेतकरी जीवंत ठेवण्यासाठी तत्काळ पशुखाद्याचे दर कमी करावेत, शेतकऱअयांच्या पिकासाठी लागणारे सर्व रासायनिक खते बी बियाणे, औषधे यांचा दर आभाळाला भिडले आहेत. अशा कोरोना महामारीत सुध्दा जीवनावश्यक किरणा मालाचे दर भरघोस वाढलेले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील कोरना प्रादुर्भाव लॉॅकडाऊनचा फायदा घेत सर्व खासगी दूध संघांनी प्रती लीटर आठरा ते वीस रुपयांनी कमी खरेदी दर देत असून शेतकर्‍यांचा दुग्ध व्यवसाय हा मोडकळीस आला असून तसचे अशा परिस्थितीत पशूधन वाचविण्यासाठी व दूध उत्पादक शेतकरी जीवंत ठेवण्यासाठी वाढविलेले पशुखाद्याचे दर तत्काळ कमी करावेत. गेल्या लॉकडाऊनपासून अचानक उद्धभवलेल्या कोरोना व लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे प्रती लीटर २५ रुपये व बरखड खर्चासह सर्व खासगी दूध संगांनी दर बंधनकारक असतानासुध्दा दूध ुत्पादकांना परवेल का नाही. याची काढी मात्र विचार न करता दूध संघांनी डायरेक्ट १८ ते २० रुपये प्रती लीटर दर देवून दूध संगांनी दूध उत्पादक शेतकर्‍यांवरती अन्याय केलेला आहे.
सर्व खासगी दूध संघांनी मनमानी कारभार करत फॅट व एस.एन.एफ मध्ये रिव्हर्स १ रुपये ठेवला. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे.राज्यातील खासदी दूध संगांनी कोरोना व लॉकडाऊनच्या नावाखाली दडत असला तरी दूध संगांनी त्या दुधाची दूध पावडर व बटर तयार करुन परदेशात निर्यात केली असून व करीत असून भारत देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये दूध संगांनी सध्या पावडरची विक्री सुरु केली असून व राज्यातील खासगी दूध संगांनी दूध पॅकिंग पिशवीचे दर व इतर प्रोडक्टचे दर कमी केले नाहीत. तसेच शेतकर्‍यांच्या दुधाच्या जीवावरती दूध पावडर, पिशवी, बटर व इतर सर्व दुग्धजन्य प्रोडक्टचा पाच पट फायदा गेल्या लॉकडाऊनपासून ते आज तागायत संघाला मिळत असून त्यावरती दूध संघ कोट्यावरधी रुपयांची कमाई केली असून त्यांनी त्वरित गेल्या लॉकडाऊनपासून ते आजप्रयंतचा प्रती लीटर पाच रुपयांचा फरक दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा.
तसेच शेतकर्‍यांना शेती पिकविण्यासाठी लागणारे रासायनिक खते, बी बियाणे, औषधे व इतर सर्व प्रकारचे दर सुमारे ५०० ते ७०० रुपयांनी वाढले आहेत. तरी त्यांच्या शेतीमध्ये पिकणार्‍या पिकांच्या उत्पन्नाचे दर वारंवार कमी होत आहे. ऊ जीवनावश्यक लागणारे किराणा माल व इतर सर्व वस्तूंचे दर वाढत असून त्याच्यावर आपण योग्य नियंत्रण ठेवावे. अन्यथा कष्टकरी, गोरगरीब मजूर यांनी जगायचे तरी कसे असा प्रश्‍न निर्माण होत आहे. ते आत्महत्यास प्रवृत् होण्यास भाग पडत आहेत. तरी आपण वरील गोष्टीत लक्ष देवून योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती.
निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भैय्या देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत नलवडे, जिल्हा उपाध्यक्ष बापू नवले, तालुकाध्यक्ष सुभाष शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष आप्पा भूई, परमेश्‍वर कोले, मोहन घाडगे, योगेश डूबल, सचिन भूसे, संतोष चव्हाण, प्रविण नलवडे, भजनदास डूबल, सद्गुरु मेटकरी, संतोष मेटकरी, रोहित लोंढे, केदार क्षीरसागर, सचिन कोळेकर, गणेश मस्के, लक्ष्मण चव्हाण, अशिष क्षीरसागर यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *