

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली अनेक निर्बंध लादले असून अत्यवश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने,आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत.या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने आज गुरुवार दिनांक ३ जून रोजी शहरातील विविध भागात कारवाई करीत ४ दुकानदाराविरोधात भादवि क.188,269प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजच्या कारवाईत शहरातील नवीपेठ परिसरातील इंद्रायणी साडी सेंटर,दीपक ड्रेसेस,प्रशांत शिलाई मशीन, झेंडा चौक परिसरातील निकते स्टेशनरी हे दुकाने जिल्हाधीकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग करत उघडण्यात आली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हि कारवाई करण्यात आली आहे.