पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सर्वजण खूप मोठ्या विळख्यात अडकलो आहे त्यामुळे कोरोनाच्या या प्रकोपात सर्वांनी एकमेकांना मदतीसाठी पुढे सरसावले पाहिजे असे आवाहन नूतन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील गादेगांव येथील कोविड केअर केंद्रास भेट देवून आ. समाधान आवताडे यांनी व्यक्तिगत स्वरूपात अर्थिक मदत केली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. सद्य काळातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्वांनी एकजुटीने व एकदिलाने कार्य करून सामूहिक प्रयत्नांनी या महामारीचा सामना करावयाचा आहे. त्या अनुषंगाने समाजातील दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने निरनिराळ्या मार्गांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले.
गादेगांव येथील कोविड केअर केंद्रास आ. आवताडे यांनी भेट देवून तेथील आरोग्य आधिकारी, कर्मचारी यांच्याशी विविध आरोग्यविषयक मुद्द्यांवर चर्चा करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर तेथील उपलब्ध उपचार सेवा आणि इतर आरोग्य सोयी – सुविधा याबद्दल आ. समाधान आवताडे यांनी रुग्णांशी चर्चा केली.
यावेळी सरपंच कु. ज्योती विष्णू बाबर, माजी सरपंच महादेव ( आण्णा ) बागल, आरोग्य आधिकारी डॉ. तांबोळी मॅडम, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, अविनाश मोरे, ग्रामपंचायत सदस्य मोहन बागल, महादेव फाटे, धनंजय बागल, पिंटू कळसुले, सचिन हुंडेकरी,स्वागत फाटे, सचिन बागल, शांतीनाथ बागल, डी. बिल्डर चे दत्ता बागल, कोळी, विकास बागल, आण्णा फाटे, गणेश फाटे, हरी बंदपट्टे, उद्धव बागल, अजिनाथ नागणे, गाडेकर सिस्टर आदी उपस्थित होते.