गेल्या काही दिवसात पंढरपुर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असून त्यामुळे शहर व तालुक्यास मोठा दिलासा मिळाला आहे. आज शहरात ९ तर तालुक्यात १५४ कोरोना बाधित नव्याने आढळले आहेत.तर आजच्या अहवालात एकही मृत्यूची नोंद नाही.उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.आजच्या अहवालानूसार शहरातील केवळ ८५ कोरोना बाधित उपचार घेत आहेत तर ग्रामीण भागातील १७३९ कोरोना बाधित उपचार घेत आहेत.
