ताज्याघडामोडी

पहिली ते बारावी वर्गाच्या अभ्यासक्रमात होणार 25 टक्क्यांची कपात

देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थांचे ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे, पण ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा असल्यामुळेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील विद्यार्थ्याना संकटाला […]

ताज्याघडामोडी

कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

महाराष्ट्राच्या शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात […]

ताज्याघडामोडी

10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान – धनंजय मुंडे

मुंबई : 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीतील आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री […]

ताज्याघडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लवकरच

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यासाठी वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार निकालासाठी आवश्‍यक असलेली मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आता शाळांना निकाल तयार करण्याच्या कामाला लागावे लागणार असून 30 जूनपर्यंत निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे हा निकाल लावण्यात […]

ताज्याघडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचं 100 गुणांचं मूल्यमापन होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी 100 गुणांचं मूल्यमापन करण्यात येईल. नववी आणि दहावीचे शाळाअंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. त्यानंतर जून अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात गुरुवारी (27 मे) संध्याकाळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात चर्चा झाली. या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकार […]

ताज्याघडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करावा लागणार?

नागपूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्य सरकारने टाळेबंदीची घोषणा केली. याशिवाय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याबाबत उच्च न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढत, निर्णय कसा घेतल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांवर पुन्हा अभ्यास सुरू करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. मात्र, आता […]

ताज्याघडामोडी

दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन ते तीन दिवसांत निर्णय घेणार–उद्धव ठाकरे

दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर ताशेऱे ओढले आहेत. परीक्षा रद्द करून सरकारने शिक्षणाची थट्टा चालवली आहे अशा शब्दात उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला. याबाबत तपशीलवार भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव […]

ताज्याघडामोडी

शिक्षिकेला कोरोना, 100 विद्यार्थी क्वारंटाईन

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळं अनेकठिकाणी शाळा-कॉलेज बंदच आहेत. जिथं शाळा-कॉलेज सुरू झाली तिथं कोरोनाचा संसर्ग वाढला. अशीच परिस्थिती असेल तर कोरोनाच्या संकटात दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा सवाल आता उपस्थित होतो आहे. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये लक्ष्मीबाई पाटील गर्ल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील एका शिक्षिकेला कोरोनाची लागण झाली. त्यामुळं ज्युनिअर कॉलेजातील 100 हून अधिक विद्यार्थी आणि […]

ताज्याघडामोडी

दहावीचा अभ्यासक्रम निम्मा करावा या मागणीसाठी मुख्याध्यापक,शिक्षक संघटना आग्रही

कोरोना आणि लॉककडाऊन मुळे या वर्षी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर  दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही त्यामुळे  अभ्यासक्रम निम्म्याने कमी करावा अशी मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे.सध्या ऑनलाईन शिक्षण देण्यात येत असल्याने दहावीचा 25 टक्के अभ्यासक्रम यापूर्वीच कमी करण्यात आला होता. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मे – जून महिन्यात होणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी जाहीर […]