ताज्याघडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लवकरच

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यासाठी वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार निकालासाठी आवश्‍यक असलेली मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आता शाळांना निकाल तयार करण्याच्या कामाला लागावे लागणार असून 30 जूनपर्यंत निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

अंतर्गत मूल्यमापनाद्वारे हा निकाल लावण्यात येणार असून त्याबाबतचा आराखडाही जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल तयार करण्यासाठी शाळा स्तरावर निकाल समितीही गठीत करण्याचे बंधन आहे. इयत्ता नववीसाठी 50 टक्के व दहावीसाठी 50 टक्के अशा एकूण 100 टक्के गुणांनुसार मूल्यमापन करण्यात येणार आहे.

निकाल तयार करण्याची कार्यपध्दतीही ठरवून देण्यात आलेली आहे. यात नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, तूरळक विषयक घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, श्रेणीसुधार अंतर्गतचे विद्यार्थी या सर्वांच्या निकालाच्या कार्यपद्धती निश्‍चित झालेल्या आहेत.

असे असेल वेळापत्रक

अपवादात्मक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे 11 ते

20 जूनदरम्यान मूल्यमापन करावे लागणार.

विषय शिक्षकांनी विषयनिहाय गुणतक्ते

वर्ग शिक्षकांकडे सादर करावे लागणार आहेत.

वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे निकाल समितीने परीक्षण व नियमन करुन प्रमाणित करण्यासाठी 12 ते 24 जून अशी मुदत आहे.

मुख्याध्यापकांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रमाणीमध्ये 21 ते 30 जून या कालावधीत भरावे लागणार.

हे विद्यार्थ्यांचे निकाल व अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रे सिलंबद पाकिटात विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी दि.25 ते 30 जून मुदत आहे. निकालाबाबत विभागीय मंडळ व राज्य मंडळ स्तरावरील प्रक्रिया 3 जुलैपासून सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *