ताज्याघडामोडी

”डॉन” मंडळींना उमेदवारी देणाऱ्या पक्षांच्या अडचणी वाढल्या

सर्वोच्च न्यायालयाने आज राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा वाटा कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निणर्यानुसार, आता सर्वच राजकीय पक्षांना आपले उमेदवार निवडल्यानंतर 48 तासाच्या आत गुन्हेगारी रेकार्ड द्यावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सर्वच राजकीय पक्षांना आपल्या उमेदवाराची माहिती आपल्या संकेतस्थळांवर आणि दोन वर्तमानपत्रात प्रकाशित करावी लागेल. विशेष म्हणजे या आदेशाचा पालन […]

ताज्याघडामोडी

‘भाजपचे किती नेते मला भेटले याची माहिती घ्या’

मुंबई, 23 एप्रिल : ‘अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत,’ असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांवर जोरदार पलटवार केला आहे. […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन खा.उदयनराजे यांनी दिले तीन पानी पत्र

आदरणीय साहेब… Sharad Pawar तुम्हाला माहीतच आहे कि मराठा समाज हा आरक्षणासाठी वर्षानुवर्षे खूप मोठा संघर्ष करत आहे. तरीही त्याच्या पदरात आजपर्यंत काहीच पडले नाही. यापेक्षा मला खूप दुःख होतं की मराठा समाजातल्या ४० हून अधिक मराठा बांधवानी आत्महत्या केली. मराठा समाजाची आरक्षणाची वैध मागणी लक्षात घेवून राज्य शासनाने न्या. गायकवाड आयोगाची स्थापना केली. या […]

ताज्याघडामोडी

सुजय विखे पाटील-रोहित पवार यांची छुपी युती

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बँकेची येत्या 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक आहे. मात्र त्यापूर्वीच जिल्हा बॅंकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय कुरघोड्यांना उधाण आले आहे. जामखेड विविध सेवा मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड होणार आहे. राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्या छुप्या युतीमुळे जगन्नाथ राळेभात यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु […]

ताज्याघडामोडी

भाजपला धक्का, 3 वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई, 6 फेब्रुवारी : भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. हेमेंद्र मेहता भाजपच्या चिन्हावर तीनवेळा पूर्वीच्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे मेहता यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या […]

Uncategorized

पंढरपूर शहर तालुक्यात भाजपाला येणार ”अधिकृत अच्छे दिन”

पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात भाजपाच्या वाटचालीचा इतिहास उलगडुन पाहिला तर भाजपचे अस्तित्व हे निवडणुकीच्या राजकरणात जरी गेल्या तीस वर्षाच्या वाटचालीत नगण्य ठरले असले तरी पंढरपूर शहराच्या राजकरणात भाजपा आणि त्याचे पदाधिकारी हे कायम आक्रमक राहिल्याने या पक्षाचा दबदबा होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकरणात जरी देशव्यापी व राज्यव्यापी विविध पक्ष कार्यरत असले […]

Uncategorized

कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

          राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज स्व.भारत भालके यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी  सरकोली ता.पंढरपूर येथे आले असता त्यांनी भालके परिवाराची भेट घेऊन त्यांना धीर दिला.खा.शरद पवार यांच्या या भेटीमुळे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील स्व.आ.भारत भालके समर्थकांना मोठा दिलासा मिळाला असून स्व.आ.भारतनाना ज्या पवार साहेबांना आपले दैवत मानत होते साक्षात तेच शरद पवार […]

ताज्याघडामोडी

विधानमंडळास अंधारात ठेवून खाजगीकरण- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस

           मुंबई – येथील आझाद मैदानावर आज महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघांचे कार्याध्यक्ष सचिन जाधव सर यांनी उमेद कर्मचारी यांचे आंदोलनास पाठिंबा जाहिर केला. या प्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उमेद कल्याणकारी मंडळाच्या अध्यक्षा चेतन लाटकर, सचिव बलवीर मुंढे, अर्चना शहा, सचिव शाहरूख […]