ताज्याघडामोडी

सिरमच्या आदर पुनावाला यांना केंद्र सरकारनेच दिली धमकी; राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

अहमदनगर – देशात करोना संसर्गाने रौद्ररुप धारण केल्यानंतर केंद्र सरकारने करोना लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली होती. मात्र देशात केवळ दोनच कंपन्या करोना लसीची निर्मिती करत असल्यामुळे सहाजिकच लसीचा तुटवडा निर्माण झाला. या मुद्दावरून राजकारण तापलं होतं. त्यातच करोना लस निर्मितीत आघाडीवर असलेल्या सिरमचे प्रमुख आदर पूनावाला यांनी देश सोडून इंग्लंड गाठलं. त्यावेळी त्यांनी आपल्याला […]

ताज्याघडामोडी

फडणवीसांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई, 02 जून: माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओके येथे जाऊन भेट घेतली. एक दिवसाआधीच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताईनगरचा दौरा केला होता. त्यानंतर आज खडसे पवारांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ खडसे यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री पवारांना म्हणाले, सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे पवार यांना सांगितले. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून केलेली […]

ताज्याघडामोडी

शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार होते. सोलापूर जिल्ह्यातील लोकं आंदोलन करणार आहेत, असं समजताच पोलिसांनी गोविंद बागेबाहेर सुरक्षा वाढवली आहे. दोन आंदोलकांना बारामतीत पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आला […]

ताज्याघडामोडी

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची संपत्ती केली जगजाहीर, उद्धव ठाकरेंना विनंती करून म्हणाल्या…

मुंबई, 19 मे: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे  यांच्या नावांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण, करुणा मुंडे यांनी आज एक फेसबूक लाईव्ह केलं आणि त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये करुणा मुंडे यांनी चक्क धनंजय मुंडे यांची सपत्ती जाहीर केली आहे. यासोबतच करुणा मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हात जोडून […]

ताज्याघडामोडी

माझ्या प्रेमकथेचे रहस्य लवकरच उलगडणार, करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ

मुंबई : बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. आपली प्रेमकथा पुस्तक रुपात प्रकाशित करणार असल्याचं करुणा यांनी फेसबुक पोस्टमधून जाहीर केलं आहे. त्यामुळे करुणा यांच्या वैयक्तिक जीवनातील कुठल्या गोष्टी वाचायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांच्यावर काही […]

ताज्याघडामोडी

“तर जलसंपदा विभागच बंद करा!”, जयंत पाटील मुख्य सचिवांवर संतापले

मुंबई | जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून झालेला वाद ताजा असतानाच विभागाच्या विविध कामांच्या मंजूर नसताना पुन्हा वित्त विभागाकडे पाठविण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काल (१२ मे) मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना चांगलेच धारेवर धरत नाराजी व्यक्त केली. असेच चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करून टाका, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीच्या आमदारावर गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण, अण्णा बनसोडेंच्या मुलावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड, 13 मे : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अण्णा बनसोडे यांच्या मुलगा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यावर जबरदस्तीने कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केल्या प्रकरणी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करणारा तानाजी पवार हा AG इन्व्हायरो कंपनीचा कर्मचारी आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

केमिस्ट अधिकाऱ्याचा मारहाणीनंतर मृत्यू; पोलिसांनी केली राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला अटक

साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांचा मारहाणीनंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना मंगळवारी वडूज पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार १५ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. […]

ताज्याघडामोडी

फडणवीसांचा कायदा टिकला असता तर इथे यावं लागलं नसतं, उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केल्यानंतर जोरदार राजकारणाला सुरुवात झालीय. मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतलीय. त्या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू भाजपकडे टोलवला आहे. मराठ्यांची लढाई ही सरकारविरोधात नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी […]