पिंपरी चिंचवड, 13 मे : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अण्णा बनसोडे यांच्या मुलगा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यावर जबरदस्तीने कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केल्या प्रकरणी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करणारा तानाजी पवार हा AG इन्व्हायरो कंपनीचा कर्मचारी आहे. तसंच तो माजी CRPF जवान आहे. आपल्या बचावासाठी अण्णा बनसोडे याच्यावर गोळीबार केला होता, दावा तानाजी पवार याने केला आहे.
त्यामुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.
पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. याच परिसरात बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तानाजी पवार याने अण्णा बनसोडे याच्यावर गोळीबार केला होता. तानाजी पवारने पिस्तुलीतून अण्णा बनसोडे यांच्यावर 3 राऊंड फायर केले होते. या गोळीबारातून अण्णा बनसोडे हे थोडक्यात बचावले. पोलिसांनी तानाजी पवारला ताब्यात घेतले.
धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजसमोर
दरम्यान अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. ज्या तानाजी पवार नामक व्यक्तीने गोळीबार केल्याचा आरोप केला जातोय त्याला आमदार अण्णा बनसोडेंच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली.
त्या मारहाणीचे सीसीटीव्ही फूटेज सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. तसंच एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आमदार अण्णा बनसोडे यांनी संबंधीत व्यक्तीला शिवीगाळ केल्याचे सांगण्यात येत आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.