सांगली जिल्ह्यातील बेळंकी गावातील निवृत्त पोलीस हवालदाराने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली असून या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.अन्नासो गुरसिद गव्हाणे (वय 65) असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. तर मालन अन्नासो गव्हाणे (वय 50) पत्नी आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत. सदर घटनेतील मयत पोलीस […]
Tag: #police
खोट्या तक्रारी करणाऱ्या महिलांवर होणार कारवाई
महिलांवरील अत्याचाराच्या घटना बघता शक्ती कायदा लवकरच लागू करण्यात येणार आहे. मात्र महिलादेखील दहा ते वीस वर्षानंतर हेतूपरस्पर अत्याचाराच्या तक्रारी करतात. यातील बहुसंख्य तक्रारी या खोट्या असतात. अशा महिलांवर बंधन ठेवण्यासाठी, वेळप्रसंगी कारवाईची तरतूद शक्ती कायद्यात असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चंद्रपुरातील बल्लारपूरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गृहमंत्री देशमुख […]
गुन्हा केला तर भरावा लागेल 50 लाखांपर्यंत दंड!
मुंबई, 22 जानेवारी : गुन्हेगारांना चाप बसावा याकरता पोलिसांकडून अनेक युक्त्या लढवल्या जातात. मुंबई पोलिसांनी तर एक पाऊस पुढे टाकत गुन्हेगारांना आळा बसावा याकरता गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांकडून चांगला वर्तन व्हावे म्हणून बॉण्ड भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जर या बाॅण्डचे उल्लंघन केले तर 15 ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड या गुन्हेगारांना भरावा […]
६ लाख ६६ हजारांच्या फसवणूक प्रकरणी राज पाटील यांच्यासह तिघांविरोधात फिर्याद दाखल
विवाह संस्थेमध्ये काम करून महिना १५ हजार रुपये मिळतील असे सांगत तसेच आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून ८० हजार रुपये मिळवून देतो,विजातीय विवाहासाठी ५० हजार मिळवून देतो आमची महाराष्र्ट् शासन संचलित नवरी मिळे नव-याला या नावाने सदरची संस्था असून सदर संस्था मार्फत आंतरजातिय विवाह झालेल्ा नवरी व नव-याला शासन अनुदान देते व त्याकरिता तुम्ही काही सदस्यांना आपल्या […]
टाकळी रोड जगदंबा नगर येथे घरफोडी
पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी हद्दीतील जगदंबा नगर येथे घरमालक कुटूंबासह परगावी गेल्याची संधी साधत चोरटयांनी दरवाजाचे कडीकोयंडा कुलूप उचकटून सोन्याचांदीचे दागिने,चांदीच्या मूर्ती तसेच रोख रक्कम ५० हजार लंपास केली असून या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.या बाबत सोमनाथ देठे रा.लक्ष्मी टाकळी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली […]
बोगस लग्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
जालना : वराकडील मंडळींकडून पैसे उकळून खोटे लग्न करणाऱ्या वधूंच्या एका टोळीला जालन्यातील चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ वधुंसह एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. गुजरात मधील तरुणांशी लग्न केल्यानंतर सासरी जाताना तिन्हीही वधूंनी रस्त्यावर गाडी थांबवून बाथरूमला जाण्याचं निमित्त करून पोबारा केल्यानं हा प्रकार उघड झालाय.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या […]
रेल्वे उड्डाण पुलावरून उडी मारून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
बीड, 19 जानेवारी : बीड जिल्ह्यातील परळी इथं रेल्वे उड्डाणपुलावरून उडी मारुन एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुनील घोळवे असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परळीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुनील सुंदरराव घोळवे बक्कल क्रमांक 755 यांनी सोमवारी संध्याकाळी […]
क्रिकेटच्या मॅचवरून दोन गटात तुफान राडा
पनवेल, 19 जानेवारी : नवी मुंबईमध्ये क्रिकेटच्या मॅचवेळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. रविवारी कंळबोलीमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये स्थानिक नगरसेवकाच्या टीमचा विजय झाला, पण यानंतर दोन टीममध्ये बाचाबाची झाली. यानंतर रात्री 10 च्या सुमारास विजय झालेल्या टीमच्या खेळाडूंच्या मेडिकल स्टोअरमध्ये पराभूत झालेले खेळाडू […]
सॉफ्टवेअर इंजीनियरने केली बावीस हजार लोकांची फसवणूक
मुंबई सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आशिष बिपीनभाई आहिर या 32 वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक केली आहे. मुळचा गुजरातमधील सुरतचा रहिवासी असलेल्या आशिषनं लंडनच्या प्रतिष्ठित संस्थेमधून शिक्षण घेतले होते. कोरोना व्हायरसच्या काळात त्यानं लंडनमधील नोकरी सोडली होती. त्यानंतर स्वत:ची कर्ज फेडण्यासाठी त्यानं बोगस वेबसाईट बनवली आणि लोकांची फसवणूक सुरु केली. आशिषनं ‘शॉपी डॉट कॉम’ ही वेबसाईट […]
पोलिसांचा गणवेश बदलण्याच्या मागणीचा विचार करू -गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : पोलीसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा आहे. त्यामुळे गणवेशात बदल करावेत अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करू. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी करू असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. राज्यातील पोलिसांचा गणवेश बदलणार असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. पोलिसांच्या गणवेशात बदल झाल्यानंतर गणवेशात […]