ताज्याघडामोडी

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी,मुलासह आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील बेळंकी गावातील निवृत्त पोलीस हवालदार‌ाने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली असून  या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.अन्नासो गुरसिद गव्हाणे (वय 65) असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. तर मालन अन्नासो गव्हाणे (वय 50) पत्नी आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत.     

सदर घटनेतील मयत पोलीस हवालदाराचा मुलगा महेश यास शेअर बाजरात गुंतवणूक करत होता व यात त्यास फार मोठा आर्थिक फटका बसल्याने संपूर्ण कुटूंब तणावाखाली वावरत होते अशी चर्चा होताना दिसून येत असली तरी आत्महत्ये मागचे खरे कारण काय हे अजून स्पष्ट झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *