कोल्हापूरची अंबाबाई, जोतिबा या मंदिरांसह कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गातील सुमोर तीन हजारांहून अधिक मंदिरांचा समावेश असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली आहे. भाजपचे वर्चस्व असलेल्या चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय महेश जाधव हे या समितीचे अध्यक्ष होते. ही समितीच आता बरखास्त झाल्यामुळे महाविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला आहे. समितीचा कार्यभार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे […]
Tag: #MAHARASHTRA
राज्यात लॉकडाऊन नाही; जाणून घ्या 30 एप्रिलपर्यंत कसे असतील नियम
मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण आज झालेल्या बैठकीत 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन नसल्याचा पण कठोर निर्बध लावण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू होणार आहेत . – उद्या रात्री ८ पासून कडक निर्बंध– 30 एप्रिलपर्यंत […]
सरकारचं ठरलं ! राज्यात आता कोणत्याही क्षणी होऊ शकतं ‘लॉकडाऊन’
मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुक्रवारी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला होता. परंतु, रुग्णवाढ अशीच झपाट्याने वाढत राहिली तर डॉक्टर आणि नर्सेस कुठून उपलब्ध करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन पर्याय नसला तरी करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन […]
पुन्हा लॉकडाऊन लावला तर लोकांच्या खात्यात पैसे जमा करा, काँग्रेस नेत्याचा सरकार सल्ला
मुंबई, 30 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे औरंगाबाद , बीड, नागपूर, जळगावमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण, लॉकडाऊन जर लावण्याचा निर्णय घेतला जात असेल तर बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रक्कमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिला आहे. […]
मुख्यमंत्र्यांनी हाय व्होल्टेज बैठकीत लॉकडाऊनसह 7 मुद्द्यांवरून प्रशासनाला दिले आदेश
मुंबई, 28 मार्च : राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. ‘मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल,’ असे आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच […]
राज्यात आजपासून कडक निर्बंध; रात्री 8 नंतर बाहेर पडाल तर होईल शिक्षा
मुंबई, 27 मार्च: कोरोनाव्हायरसचा प्रकोप राज्यात प्रचंड वाढल्यानंतर आणि आवाहन करूनही लोकांची गर्दी कमी होत नाही, हे लक्षात आल्यानंतर राज्याने Mission Begin again अंतर्गत निर्बंध अधिक कडक केले आहेत. आजपासूनच (27 मार्च मध्यरात्रीपासून) हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये असं सांगण्यात आलं आहे. […]
राज्यातील सर्व खासगी कार्यालयं, आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती;शासनाचे आदेश
मुंबई : कोविड रुग्णांचा महाराष्ट्रात पुन्हा झपाट्याने वाढणारा आकडा पाहता काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ लागले आहेत. याच धर्तीवर नुकतेच राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये ( आरोग्य, इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) इतर ठिकाणी 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.सर्व […]
देशभरातले टोलनाके हटवणार
येत्या वर्षभरात देशातील सर्व टोल नाके बंद करण्यात येतील आणि टोलची रक्कम जीपीएस इमेजिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमा केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली.गडकरी यांनी टोल नाके बंद करण्याचा आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना सांगितले की, गेल्या सरकारनी शहरांमध्ये अनेक ठिकाणी टोल नाके उभे करून पैसे […]
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा बोलले; आता दिला ‘हा’ इशारा
मुंबई: राज्यातील करोना संसर्गाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत. त्याअनुषंगाने विविध स्तरांवर त्यांच्या आढावा बैठकाही सुरू असून आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन हॉटेल्स, […]
महावितरणच्या गलथान कारभारामुळे लाखमोलाचा ऊस जळून खाक
जालना, 07 मार्च : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेम्भी गावात महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे काका आणि पुतण्याचा 3 एकर ऊस डोळ्या देखत जळून खाक झाला आहे. मेहनतीने उगवलेल्या पिकाची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली आहे. जगन्नाथ कळंब आणि रघुनाथ कळंब अशी या पीडित शेतकऱ्यांची नावे असून दोघांनी आपल्या वाट्याच्या दीड-दीड एकर शेतात उसाची लागवड केलेली होती. […]