ताज्याघडामोडी

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त

कोल्हापूरची अंबाबाई, जोतिबा या मंदिरांसह कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गातील सुमोर तीन हजारांहून अधिक मंदिरांचा समावेश असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली आहे. भाजपचे वर्चस्व असलेल्या चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय महेश जाधव हे या समितीचे अध्यक्ष होते. ही समितीच आता बरखास्त झाल्यामुळे महाविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला आहे. समितीचा कार्यभार  जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, शिर्डी, पंढरपूर व सिद्धिविनायक या सर्वच देवस्थान समित्यांपैकी सिद्धिविनायक वगळता सर्व समित्यांवर भाजपचे वर्चस्व होते. या समित्या बरखास्त करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाने तयार केला होता. पहिले पाऊल म्हणून गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *