करारावरती हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेचा विनयभंग केला. तसेच, सोशल मीडियावर. अश्लील फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. पिंपरी येथील मोरवाडी कोर्टासमोर चारचाकी गाडीत 10 फेब्रुवारी 2022 रोजी ही घटना घडली. पिडीत महिलेने दिलेल्या तक्रार अर्जावरुन तीन जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिरोज शब्बीर सय्यद, समीर मुलानी (दोघेही रा. यमुना नगर, निगडी […]
गुन्हे विश्व
प्रेयसीच्या पतीसोबत FB वर मुलगी बनून त्यानं मैत्री केली, मग भेटायला बोलावलं अन्…
पान मसाला व्यापारी मुकेश पंडित यांची झारखंडमधील धनबादमध्ये २६ मार्च रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. या हत्येचा खुलासा करताना धनबाद पोलिसांनी मुकेशची पत्नी नीलम देवी आणि तिचा प्रियकर उज्ज्वल शर्मा यांना अटक केली आहे. उज्ज्वलच्या सांगण्यावरून मुकेशचा मोबाईल आणि पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या चौकशीत […]
भाजप नगरसेवका विरोधात दरोड्यासह खंडणीचा गुन्हा दाखल
घर खाली करण्यासाठी घरात अनाधिकाराने प्रवेश करून कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सहा ते सातजणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुह्यात नवीन कलमांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता दरोडा, खंडणी व विनयभंग आदी कलमे वाढविण्यात आली आहेत. संभाजीनगर रोडवरील एका व्यक्तीने फिर्याद दिली होती. त्यानुसार नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभि बुलाखे […]
कर्ज परत केलं नाही म्हणून बायकोचे अश्लील फोटो व्हायरल केले, वसुली एजंटचा प्रताप
बँक, कंपनी अशा ठिकाणाहून कर्ज घेणाऱ्यांना नेहमी वसुली एजंटचे फोन येणं ही नेहमीची बाब. बऱ्याचदा असे एजंट धमक्याही देतात. त्यावरून वाद निर्माण होतात. पण एका वसुली एजंटने कर्ज घेणाऱ्या व्यक्तिच्या पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल केले आहेत. गुजरात येथील अहमदाबाद येथे हा प्रकार घडला आहे. एका अॅप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज घेणं एका इसमाला महागात पडलं आहे. कोरोना […]
फुकट भाजी न दिल्याने गुंडांनी विक्रेत्याला पाया पडायला लावले
फुकट भाजी दिली नाही, म्हणून गुंडांनी विक्रेत्या तरुणाला मारहाण करुन पाया पडायला लावले तसेच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. धनकवडी परिसरातील बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर येथील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या संबंधी चार व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात या गुंडांनी एका तरुणाला त्याच्या आईसमोर […]
वाळूच्या वादातून युवकाचा खून; सहाजणांवर गुन्हा
गेल्या वर्षी वाळू काढण्याच्या वादात झालेल्या खुनी हल्ल्याच्या रागातून प्रशांत भोसले याच्यासह सहाजणांनी युवकाचा तलवार, कोयत्याने वार करून खून केल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात सहाजणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगावमध्ये तणावाचे वातावरण असून, गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. वैभव विकास ढाणे (वय 28) […]
पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल एनआयएच्या मुंबई शाखे कडे आला आहे. मोदींना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार असल्याचा उल्लेख मेल मध्ये असून त्यांना मारण्यासाठी 20 किलो आरडीएक्स तयार असल्याचे म्हणले आहे. धमकी देणाऱ्याने त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेला एक ई-मेल आला आहे. यामध्ये पंतप्रधान […]
ट्रक सोडण्यासाठी 11 हजारांची लाच, पोलीस उपनिरीक्षक रंगेहाथ जाळ्यात
अकरा हजार रुपयांची लाच घेताना नांदेडमध्ये पीएसआयला रंगेहाथ पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याला अटक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख नाजीर हुसेन यांना अटक करण्यात आली. गुन्ह्यात जप्त केलेला ट्रक सोडण्यासाठी त्यांनी अकरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. लाच घेताना पीएसआय हुसेन यांना एसीबीने रंगेहाथ […]
बायको मुलांसह चौघांचा खून करणाऱ्या विनोद गायकवाडला अटक
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येनंतर मोठी खळबळ माजली होती. पोलिसांनी आता या गुह्याची अवघ्या 48 तासांत उकल केल्याचा दावा केला आहे. या खून प्रकरणातील संशयित आरोपी विनोद मराठी उर्फ विनोद गायकवाड याला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याची पुढील चौकशी सुरू आहे. अहमदाबादच्या ओढव परिसरात एक महिला, तिची 15 आणि 17 वर्षांची दोन […]
5 मिनिटे उशिरा आल्याने मुख्याध्यापकाने शिक्षिकेच्या कानाखाली मारली
शाळेत पोहोचण्यास 5 मिनिटे उशीर झाला म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाने उशीरा आलेल्या शिक्षिकेच्या दोन कानशिलात लगावल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील पसियापुरा गावात असणाऱ्या ज्युनियर हायस्कूल मध्ये सातवी आणि आठवी इयत्तेच्या परीक्षा सुरु होत्या. यामुळे शाळेचे मुख्याध्यापक शाळेत आधीच हजर झाले होते. शाळेतील एक शिक्षिका शाळेत 5 मिनिटे उशिरा पोहोचल्या. यावर मुख्याध्यापकांनी […]











