गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कर्ज परत केलं नाही म्हणून बायकोचे अश्लील फोटो व्हायरल केले, वसुली एजंटचा प्रताप

बँक, कंपनी अशा ठिकाणाहून कर्ज घेणाऱ्यांना नेहमी वसुली एजंटचे फोन येणं ही नेहमीची बाब. बऱ्याचदा असे एजंट धमक्याही देतात. त्यावरून वाद निर्माण होतात. पण एका वसुली एजंटने कर्ज घेणाऱ्या व्यक्तिच्या पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल केले आहेत.

गुजरात येथील अहमदाबाद येथे हा प्रकार घडला आहे. एका अॅप्लिकेशनच्या माध्यमातून कर्ज घेणं एका इसमाला महागात पडलं आहे. कोरोना काळात आर्थिक संकटामुळे आपल्या मित्रांच्या सल्ल्यानुसार या माणसाने डिसेंबर 2021मध्ये या माणसाने कर्ज घेतलं होतं. त्याला 6 हजार रुपये मंजूर झाले होते आणि प्रत्यक्षात 3480 रुपये मिळाले होते. आठवड्याभरात त्याने पैसे परत देखील केले होते.

पैसे परत केल्यानंतर त्याने आर्थिक तंगीमुळे 14 वेगवेगळ्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून 1.2 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. त्यानंतर जानेवारी महिन्यात त्याने व्याजासकट 2.36 लाख रुपये परत केले. पण पैसे परत केल्यानंतरही त्याच्याकडे वसुली एजंटचा कॉल येत राहिला. तसंच त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्यांनाही धमक्या येऊ लागल्या.

इतक्यावर न थांबता रिकव्हरी एजंटने या इसमाच्या पत्नीचा फोटोही मिळवला. तो मॉर्फ करून त्याचा अश्लील फोटो बनवला आणि तो आधी त्या इसमाला पाठवला गेला. त्यानंतर त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांनाही तो पाठवण्यात आला.

या प्रकरणी पीडित इसमाच्या तक्रारीवरून आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अश्लील फोटो पाठवणे, फसवणूक करणे आणि धमकी देणे इत्यादी गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *