गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ट्रक सोडण्यासाठी 11 हजारांची लाच, पोलीस उपनिरीक्षक रंगेहाथ जाळ्यात

अकरा हजार रुपयांची लाच घेताना नांदेडमध्ये पीएसआयला रंगेहाथ पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याला अटक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख नाजीर हुसेन यांना अटक करण्यात आली. गुन्ह्यात जप्त केलेला ट्रक सोडण्यासाठी त्यांनी अकरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. लाच घेताना पीएसआय हुसेन यांना एसीबीने रंगेहाथ बेड्या ठोकल्या.

कोण आहे आरोपी?

57 वर्षीय शेख नजीर हुसेन आमिर हजमा हा पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस स्टेशनमध्ये त्याची पोस्टिंग आहे. तो नांदेडच्या खडकपुरा भागातील वकील कॉलनीत राहतो.

काय आहे आरोप?

आरोपी लोकसेवकाने तक्रारदाराच्या मामा विरुद्ध उमरी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात मदत केली म्हणून आणि गुन्ह्यातील जप्त असलेला ट्रक सोडण्यासाठी 11 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारली आहे.

डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद अतिरिक्त पदभार नांदेड, धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि,नांदेड परिक्षेत्र नांदेड, श्री राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड यांनी तपासात मार्गदर्शन केले.

अशोक इप्पर, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड हे सापळा अधिकारी होते, तर सापळा पथकात पोना एकनाथ गंगातीर्थ, जगन्नाथ अनंतवार, ईश्वर जाधव , शेख मुजीब लाप्रवि नांदेड होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *