करारावरती हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेचा विनयभंग केला. तसेच, सोशल मीडियावर. अश्लील फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. पिंपरी येथील मोरवाडी कोर्टासमोर चारचाकी गाडीत 10 फेब्रुवारी 2022 रोजी ही घटना घडली.
पिडीत महिलेने दिलेल्या तक्रार अर्जावरुन तीन जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिरोज शब्बीर सय्यद, समीर मुलानी (दोघेही रा. यमुना नगर, निगडी ) आणि त्या दोघांचा एक मित्र असे तीन जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.