राजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारची तपासणी करण्यात आली असता त्यात नोटांचं घबाड सापडलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यास सुरुवात केली. सकाळपासून या नोटांची मोजणी सुरु होती. नोटा एवढ्या प्रमाणावर होत्या की नोटा मोजता मोजता संध्याकाळ उलटली. त्यामुळे पोलीस आणि अधिकारीही चक्रावून गेले. कोट्यवधी रुपये घेऊन निघालेली ही […]
गुन्हे विश्व
“तेरा मेरा साथ’ म्हणत चक्क 13 जणांशी केलं लग्न; सगळ्या मुलांना लुटलं; अखेर पोलिसांनी पकडलं.
‘तेरा’ साथ है तो, मुझे क्या कमी हैं’, अशी विवाहाबद्दलची भावना कुठं आणि विवाह करुनही समाधानी न राहणाऱ्या, एकामागून एक 13 विवाह करत 13 नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबांना लुटणाऱ्या एका लालची तरुणीला अखेर नंदुरबार पोलिसांनी हातकडीच्या बंधनात बांधलं आहे. ‘सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय का?’ या गाजलेल्या गाण्यातील सोनू हेच या तरुणीचं नाव असून तिनं […]
अलर्ट ! ‘या’ नंबरहून SMS आल्यास दुर्लक्ष करा, बँकेतील अकाऊंट होईल रिकामं, जाणून घ्या
सतत होणाऱ्या अनेक माध्यमातून लोकांची फसवणूक होत आहे. याला चाप लावण्यासाठी सायबर क्राईम (Cyber Crime) विभागाने काही क्रमांक शेअर करत सर्वांना दक्षतेचा इशारा दिलाय. या क्रमांकावरून आलेल्या SMS मधून फसवणूक करायचा अधिक धोका आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईमने दिला आहे. अधिक माहितीनुसार, तुम्हाला देखील हा फसवणुकीता मेसेज आला असेल. त्यामध्ये तुमचे सिम काही […]
दुहेरी मोक्क्याच्या गुन्ह्यातील आंदेकर टोळीतील फरारी गुन्हेगारांना अटक; पिस्तूल व काडतुसे जप्त
पुणे – चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या पथकाने आंदेकर टोळीतील दुहेरी मोक्का मध्ये फरारी असणाऱ्या कुप्रसिध्द गुन्हेगारांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूल व काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत.सुरज ऊर्फ गणेश अशोक वट्ट (24 रा. , मंगळवार पेठ पुणे), पंकज गोरख वाघमारे (26, रा.महात्मा जोतिबा फुले शाळेजवळ , गाडीतळ हटपसार पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. चतुुश्रृंगी पोलिसांनी […]
भाजप युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांना शरद पवार, रोहित पवारांवरील टीका भोवली, सायबर पोलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई : भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यावर ट्विटरवर टीका केल्याने कारवाई करण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. प्रदीप गावडे यांना बांद्रा सायबर सेल पोलिसांनी सकाळी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवताच गावडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा […]
कर्जबाजारी रिक्षाचालकाची आत्महत्या; पत्नीच्या हाताने द्या अग्नीडाग, सुसाईड नोटमध्ये इच्छा
लॉकडाऊनमुळे कर्जाचे हप्ते फेडू शकत नसल्यामुळे एका रिक्षाचालक तरुणाने गुरुवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत यांच्या पार्थिवाला पत्नीने अग्नी डाग द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली. तरुणाच्या इच्छेनुसार जड अंतकरणाने पत्नीने पतीच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. भीमराव राघू साबळे (27 रा. राजीवनगर झोपडपट्टी), असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी […]
कुख्यात गुंडाची डोक्यात दगड घालून हत्या
औरंगाबाद, 22 मे: औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथील बजाजनगर परिसरात कुख्यात गुन्हेगार आणि खूनातील आरोपी विशाल उर्फ मड्ड्या किशोर फाटे या स्वंयघोषित डॉनची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी महाराणा प्रताप चौकात मृत विशालला गाठून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. विशेष म्हणजे मृत विशालनं एक वर्षापूर्वी अशाच […]
वाळू माफियांकडून आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण
यवतमाळ जिल्ह्यात राजकीय, प्रशासकीय यंत्रणेच्या पाठबळामुळे रेती माफियांचा हैदोस वाढल्याचे दिसत आहे. यामुळेच बुधवारी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचे (आरटीआय) सिनेस्टाईल अपहरण करून त्याला ओलीस ठेवत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढच नाही तर समाजात आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये दहशत पसरावी म्हणून या कार्यकर्त्यास विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर देखील व्हायरल […]
गुन्हेगाराला फेसबुक पोस्ट पडली महागात; ‘भाई का बड्डे’ थेट पोलीस कोठडीत
पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुरापती करण्याचा मानस असल्याचा आशय असलेली पोस्ट एका सराईत गुन्हेगाराने फेसबुकवर टाकली. त्यावर त्याच्या एका चेल्याने त्याच आवेशात कमेंट देखील केली. मात्र या दोघांना आणि कथित भाईचे फेसबुक हँडल करणाऱ्या एकाला ही पोस्ट चांगलीच महागात पडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली. त्यामुळे पोस्ट टाकणाऱ्या भाईचा वाढदिवस चक्क पोलीस कोठडीत गेला. […]
कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड; गुन्हा दाखल
कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टरांनाही मारहाण केली. नगरमधील तारकपूरच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज तानाजी गडाख आणि रोहन बाबासाहेब पवार (दोघेही रा. टाकळीकाझी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. राहुल अरुण ठोकळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. […]











