गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दुहेरी मोक्क्याच्या गुन्ह्यातील आंदेकर टोळीतील फरारी गुन्हेगारांना अटक; पिस्तूल व काडतुसे जप्त

पुणे – चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या पथकाने आंदेकर टोळीतील दुहेरी मोक्का मध्ये फरारी असणाऱ्या कुप्रसिध्द गुन्हेगारांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूल व काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत.सुरज ऊर्फ गणेश अशोक वट्ट (24 रा. , मंगळवार पेठ पुणे), पंकज गोरख वाघमारे (26, रा.महात्मा जोतिबा फुले शाळेजवळ , गाडीतळ हटपसार पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

चतुुश्रृंगी पोलिसांनी फरारी आरोपींचा शोध घेण्याबाबत स्वतंत्र तपास पथक तयार केले होते.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी चतु : श्रृंगी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील पाहिजे व फरारी आरोपींची यादी तयार केली.त्यामधील मोका व दरोडयातील सराईत आरोपी सुरज ऊर्फ गणेश अशोक वड्ड व पंकज याघमारे यांचा शोध घेण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.

त्याप्रमाणे चतुःशृंगी पोलीस स्टेशन तपासपथकातील अंमलदार इरफान मोमीन, सुधीर माने यांना खबर मिळाली की , हे दोघे आदमापुर (जि. कोल्हापूर) येथे वास्तव्यास आहेत. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव यांचे नेतृत्वाखाली टिम तयार करून त्यांना 20 मे रोजी कोल्हापूर येथे पाठविले असता पथकाने अदमापुर या ठिकाणी जावून आरोपींचे ठावठिकाणाबाबत माहिती काढून सुरज ऊर्फ गणेश, पंकज गोरख वाघमारे यांना 20 मे रोजी कोल्हापूर येथून ताब्यात घेतले.

सुरज ऊर्फ गणेश अशोक वड्ड याचेकडून दाखल गुन्हयामध्ये 20, 400 एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपीं विरुध्द पुणे शहर परिसरात खुनाचा प्रयत्न , दरोडा , मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई उपायुक्त पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे , पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड , पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव , महेश भोसले , अमंलदार सुधीर माने , इरफान मोमीन , श्रीकांत वाधवले , तेजस चोपडे , संतोष जाधव , मुकुंद तारु , दिनेश गडाकुंश , प्रकाश आव्हाड , प्रमोद शिंदे , ज्ञानेश्वर मुळे यांचे पथकाने केली आहे.

गणेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात जबरी चोरी व दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. तो मोक्काच्या गुन्हयात वॉण्टेड होता. त्याच्या जवळ सापडलेल्या पिस्तूलाचा वापर तो गुन्हयासाठी करणार असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. तो मंगळवार पेठ व खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रीय होता. मागील चार महिणे पोलीस त्याच्या मागावर होती. तो कोल्हापूरवरुन तीन ते चार वर्षापुर्वी पुण्यात दाखल झाला होता. यानंतर आंदेकर टोळीच्या संपर्कात राहून गुन्हे करत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *