महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाला मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत. पण अखेर वसंत मोरे यांनी काल (शनिवारी) कात्रज गावठाण येथील हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली. या महाआरतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. […]
ताज्याघडामोडी
रामदास आठवले यांनी व्यक्त केली आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा
शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 2014 साली भाजपकडून रामदास आठवले यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्यात आले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात रामदास आठवले हे सध्या सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. संगमनेर तालुक्यातील भोजदरी या अतिदुर्गम भागाला रामदास आठवले […]
14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना थेट इशारा
’14 तारखेला माझी सभा आहे, मला माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं तुबलेलं नाहीय पण मनात काही गोष्टी आहेत त्या बोलणार आहे, 14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार ,असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टयांमध्ये व निवासी इमारतींमधील रहिवाशांनाही नळजोडणी मिळावी, यासाठी महानगरपालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी !’ या धोरणाचा […]
अजितदादांच्या सभेत शेतकरी उठला; दादांच्या समक्ष म्हणाला.. प्रांतांनी आम्हाला 5 लाख मागितले!
काटेवाडीचे सोसायटीचे कार्यालय! एक तास राष्ट्रवादीचा या उपक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते आणि अचानक अजित देवकाते नावाचे शेतकरी उठले आणि त्यांनी सांगितले, ‘दादा, हा प्रांत आम्हाला पैसे मागतो, भूसंपादनाच्या कामात पोटहिस्से करून दिले नाहीत, मुद्दाम अडथळे आणले. आम्हाला पाच लाख रुपये मागितले, अशा स्वरूपाचा गंभीर आरोप करताच सारी सभा स्तब्ध झाली. दरम्यान प्रांताधिकारी यांनी […]
तीन हजार रुपयांची लाच स्वीकारली; औसा येथे पोलीस हवालदार अटकेत
औसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर पोलीस हवालदार राजेंद्र गोरख लामतुरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजेंद्र गोरख लामतुरे यांनी तक्रारदार यांना त्यांच्याविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 4 मे रोजी सुरुवातीस 5000 […]
महाराष्ट्रातील आणखी एक भाजप आमदारावर अटकेची टांगती तलवार, कधीही अटक होण्याची शक्यता
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही भाजप नेते अडचणीत येताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापासून ते साताऱ्याचे आमदार जयकुमार गोरे असे अनेक आमदार अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे जयकुमार गोरे यांचा कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तर भाजप आमदार गणेश नाईक यांना नुकतंच अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. त्यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व […]
DJ वर मित्रांसोबत डान्स करत होता नवरदेव; लग्नाच्या काही तास आधीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
हे प्रकरण सूरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेथ गावातील आहे. 33 वर्षीय मितेश भाई चौधरी यांची वरात बालोद तालुक्यातील धामंडळा गावात जाणार होती. वरात निघण्यापूर्वी बहुतांश विधी पूर्ण करण्यात आले. थोड्याच वेळात वरात निघणार होती. आनंदाच्या प्रसंगी वराचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी डीजेवर नाचत होते. मित्रांना नाचताना पाहून मितेशलाही नाचण्याची इच्छा झाली आणि तोही डीजेजवळ […]
20 तोळे सोने पॉलिशसाठी दिले, कारागीर झाला पसार, दोन वर्षांनंतर आला ताब्यात
कल्याण पश्चिम गांधी चौक परिसरात गोल्ड पॉलिश दुकानातून 20 तोळे सोने घेऊन फरार झालेल्या कारागिरला दोन वर्षानंतर बाजारपेठ पोलिसांनी बंगालमधून ताब्यात घेतले आहे मिराजउद्दीन शेख अस या चोरट्याचे नाव असून आई आजारी असल्याचे सांगत दुकानदारांला 10 तोळे चोरीचे सोने विकले होते. कल्याण बाजारपेठ गांधी चौक येथे मुबारक शेख यांचे सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याचे दुकान […]
महाराष्ट्रातील कोरोना मृतांचा आकडा 1.47 लाख, पण सरकारने भरपाईसाठी स्वीकारले 1.81 लाख अर्ज!
1 मे पर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1,47,000 एवढी झाली आहे. असे असतानाही महाराष्ट्र सरकारने 1 लाख 81 हजार लोकांना 50 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम दिली जाणार आहे. जे मृतांच्या संख्येपेक्षा 23 टक्के अधिक आहे. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 1 मे पर्यंत महाराष्ट्रात 47,843 […]
भारतात कोरोनामुळे तब्बल 47 लाख मृत्यू! डब्ल्यूएचओचा दावा
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हिंदुस्थानातील कोरोना मृत्यूच्या धक्कादायक आकडेवारीचा खुलासा केला आहे. हिंदुस्थानात कोरोनामुळे तब्बल 47 लाख नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे. कोरोना बळींचे हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे, असा दावा ‘डब्ल्यूएचओ’ने केला आहे. या आकडेवारीमुळे मोदी सरकार जगापुढे तोंडघशी पडले आहे. मोदी सरकारने कोरोनामुळे 4 लाख 80 हजार हिंदुस्थानींचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर […]











