गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील आणखी एक भाजप आमदारावर अटकेची टांगती तलवार, कधीही अटक होण्याची शक्यता

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही भाजप नेते अडचणीत येताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापासून ते साताऱ्याचे आमदार जयकुमार गोरे असे अनेक आमदार अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं आहे.

विशेष म्हणजे जयकुमार गोरे यांचा कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तर भाजप आमदार गणेश नाईक यांना नुकतंच अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. त्यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. तर जयकुमार गोरे यांना कधीही अटक होण्याची दाट शक्यता आहे.

साताऱ्यातील मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासंदर्भात आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून आज यावर सुनावणी झाली.

यामध्ये जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाने फेटाळला असल्याने जयकुमार गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. जयकुमार गोरे यांच्यावर नेमका आरोप काय? महादेव पिराजी भिसे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट नंबर 769 मधील अल्पभूधारक शेतकरी, जो मयत आहे, त्याला जीवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज केला गेला. त्यातून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केली गेली, असा आरोप जयकुमार गोरेंवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *