ताज्याघडामोडी

14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना थेट इशारा

’14 तारखेला माझी सभा आहे, मला माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं तुबलेलं नाहीय पण मनात काही गोष्टी आहेत त्या बोलणार आहे, 14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार ,असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

मुंबईमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टयांमध्ये व निवासी इमारतींमधील रहिवाशांनाही नळजोडणी मिळावी, यासाठी महानगरपालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी !’ या धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मास्क काढून जोरदार भाषण केलं. ‘आता आपण माणसात आलोय असं वाटतंय कारण बऱ्याच दिवसांनी माईकसमोर बोलायला लागलो आहे. बऱ्याच दिवसांनी मास्क न घालता बोलत आहे बऱ्याच दिवसांनी मास्क काढला.

तसा मास्क काढायचा आहे तो 14 तारखेला काढायचा आहे. आताचा कार्यक्रम हा महापालिकेचा आहे. सर्वांसाठी पाणी देण्याचा कार्यक्रम आहे. त्याच्या राजकारण आणून पाणी गढूळ करणार नाही.

प्रत्येकाला याचे भान असले पाहिजे, कुठे काय बोलायचे याचे ज्ञान असले पाहिजे’ असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला. (घरात भक्तीगीतांसाठी स्पीकर लावल्यावरून सुरू झाला वाद; मात्र, शेवट इतका भयानक) ‘हल्ली विचारांचे प्रदुषण होतंय कोणीही काहीही बोलत आहेत. विकृत विचार मांडले जात आहे. राजकारण जरूर करा पण त्यात एक दर्जा असला पाहिजे. नुसता विरोध करणे म्हणजे विरोधी नाही, सरकारने चागले काम केले तर सांगणे ही दिलदारी आहे पण आता ती दिसत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *