गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बिलासाठी ‘डांबून’ ठेवलेल्या बाळाला मिळाला डिस्चार्ज, युवासेनेचा रुग्णालयाला दणका

कर्ज-उसनवाऱ्या करून पोटच्या गोळ्याच्या उपचारासाठी तब्बल 17 लाख रुपये मोजूनही उर्वरित 9 लाखांच्या बिलासाठी बाळाला डांबून ठेवणाऱ्या खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलला चांगलाच दणका बसला आहे. पालकाांनी कैफियत मांडताच त्याची गंभीर दखल घेत युवासैनिकांनी या रुग्णालयावर धडक देत जाब विचारला. त्यामुळे तंतरलेल्या व्यवस्थापनाने बिलासाठी अडकवून ठेवलेल्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याला अखेर डिस्चार्ज दिला आहे. इतकेच नाही तर राहिलेले […]

ताज्याघडामोडी

ग्रामपंचायतींची प्रभागरचना अंतिम होणार, 2021च्या आदेशात अंशतः बदल

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यसंख्या, प्रभागरचना आणि आरक्षण याबाबत 2021च्या आदेशामध्ये अंशतः सुधारणा करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार आधी ग्रामपंचायत प्रभागरचना अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर स्वतंत्रपणे आदेश काढत आरक्षण काढण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश 27 जानेवारीला राज्य निवडणूक आयोगाने काढला असून, तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. 24 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

4 मुलांच्या आईकडून 23 वर्षांनी लहान प्रियकराची हत्या; शेवटी पार्टनरचाही भांडाफोड

आरोपी महिलेला 4 मुलं आहेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या लिव्ह इन पार्टनरला अटक केली आहे. मृत तरुण आणि महिलेमध्ये तिच्या लिव्ह इन पार्टनरवरुन वाद झाला होता. ज्यानंतर महिलेने वीट उचलून प्रियकराच्या डोक्यात मारलं. यात त्याचा मृत्यू झाला. ACP राजीव त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार नगरमध्ये रविवारी रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. ज्याचं […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यात सायबर क्राईम तज्ञ् पोलीस कर्मचाऱ्यांच अट्टल गुन्हेगाराच्या तोडीचे कृत्य

पिंपरी चिंचवड पोलीस दलाची मान शरमेने झुकली जाईल अशी एक घटना उघडकीस आली आहे. शेकडो कोटींचे क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्या एका व्यापाऱ्याच अपहरण करून त्याच्याकडून खंडणी उकळल्या प्रकरणी चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात त्याच्या इतर आठ साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप तुकाराम खंदारे अस आरोपी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

50 लाखांसाठी फॉर्च्यूनर गाडीसह व्यापाऱ्याचं अपहरण; 10 तास रंगलं थरारनाट्य

मुंबईत एका ड्रायफ्रुट व्यापाऱ्याला आणि त्यांच्या ड्रायव्हरला फॉर्च्यूनर गाडीसह अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अपहरणकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, मुंबईतील समता नगर पोलिसांनी अवघ्या 10 तासांतच बोरिवली परिसरातून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. ड्रायफ्रुट व्यापाऱ्यासह चालक सुखरूप बचावला आहे. पोलिसांनी फॉर्च्यूनर गाडीही ताब्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खळबळजनक! जागरणाला गेलेल्या विवाहितेसोबत घडलं विपरीत, अर्धनग्नावस्थेत शेतात आढळला मृतदेह

जागरणाच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडलेल्या विवाहित महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित महिला जागरणाच्या कार्यक्रमासाठी गेली होती, पण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ती घरी परतलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळच्याच एका शेतात तिचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनेचा पुढील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तळघरात 650 लॉकर, कोट्यवधी रुपये जप्त; नोएडामध्ये माजी IPS च्या घरावर छापे

संसदेत मंगळवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पामुळे अनेकांचे बजेट कोलमडले असले तरी काहीजण कोरोना काळातही मालामाल झाले आहेत. गैरमार्गाने मालमाल झालेल्यांवर आयकर विभागाची नजर आहे. आयकर विभागाने नोएडामधील माजी सनदी अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी आढळलेल्या कोट्यवधींच्या रकमेने अधिकारीही चक्रावले आहेत. नोएडातील माजी सनदी अधिकारी आर.एन. सिंह यांच्या घरावर गेल्या 3 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. […]

ताज्याघडामोडी

वसंतदादा पतसंस्थेचा तपासणी अहवाल देण्यासाठी घेतली होती ३० हजाराची लाच

राज्यात गेल्या काही वर्षात अनेक पतसंस्था डबघाईस येऊन सर्व सामान्य लोकांनी ठेवीच्या रूपात ठेवलेल्या शेकडो कोटींना चुना लावून बंद पडल्या आहेत,अवसायनयात निघाल्या आहेत तर अनेक घोट्याळ्यातील पतसंस्थाचे संचालक राजकीय पाठबळामुळे सहीसलामत फिरताना दीसून येतात.अशा घटना रोखण्यासाठी राज्य शासनाने लेखा परीक्षण विषयक कायदे कडक केले तर मान्यताप्राप्त लेखा परीक्षकांचे अहवाल तक्रार प्राप्त झाल्यास तपासून पाहण्यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था […]

ताज्याघडामोडी

राज्यातील निर्बंध आजपासून पुन्हा एकदा शिथिल; जाणून घ्या काय सुरु, काय बंद?

संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉनचा व्हेरिएंटचा राज्यात वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत होता. पण, गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्यातील निर्बंध याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आजपासून म्हणजेच, 1 फेब्रुवारी 2022 पासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय राज्य […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नवीपेठेतील दहिवडकर वडापाव सेंटर येथे तरुणास बेदम मारहाण

पंढरपूर शहरातील नवीपेठ येथील अर्बन बँकेनजीक असलेल्या दहिवडकर वडा-भजी पाव सेंटर येथे भजी खरेदीसाठी गेलेल्या शंतनु धनंजय मोरे,वय-26वर्ष,धंदा-नोकरी जात-मराठा,रा-परदेशी नगर पंढरपूर या तरुणास या ठिकाणी भजी घेण्यासाठी आलेल्या २ तरुणांनी शिविगाळ करत लाथा बुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केल्याची फिर्याद सदर शंतनु धनंजय मोरे याने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तर या झटापटीत […]