ताज्याघडामोडी

राज्यातील निर्बंध आजपासून पुन्हा एकदा शिथिल; जाणून घ्या काय सुरु, काय बंद?

संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉनचा व्हेरिएंटचा राज्यात वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत होता. पण, गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्यातील निर्बंध याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

त्यानुसार आजपासून म्हणजेच, 1 फेब्रुवारी 2022 पासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सोमवारी राज्य सरकारने ओमिक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्काराठी 20 व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल.

अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने, उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने, मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 लोकांना प्रवेश देण्यात आला आहे.

आजपासून लागू झालेल्या नव्या नियमावलीनुसार, काय बंद, काय सुरु?

नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे नियमीत वेळवर सुरु होतील. येथे भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर या दरम्यान मास्कचा वापरही करण्यात यावा. दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकिट बूक करावे लागेल.

नियमित वेळेवर सर्व पर्यटनस्थळे सुरु होतील. तिकिट खरेदी ऑनलाईन करावी लागेल. तसेच पर्यटनस्थळावर फिरायला जाणाऱ्याचे लसीकरण झालेले असावे.

स्पा, ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये 50 टक्के उपस्थिती असावी.

अंत्ययात्रामध्ये उपस्थितीवर मर्यादा ठेवण्यात आल्या नाहीत. किती लोक उपस्थित राहू शकतात.

स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेने.

50 टक्के क्षमतेने अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क सुरु होतील.

स्थानिक प्रशासन हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ ठरवणार

lockdown

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *