ताज्याघडामोडी

वसंतदादा पतसंस्थेचा तपासणी अहवाल देण्यासाठी घेतली होती ३० हजाराची लाच

राज्यात गेल्या काही वर्षात अनेक पतसंस्था डबघाईस येऊन सर्व सामान्य लोकांनी ठेवीच्या रूपात ठेवलेल्या शेकडो कोटींना चुना लावून बंद पडल्या आहेत,अवसायनयात निघाल्या आहेत तर अनेक घोट्याळ्यातील पतसंस्थाचे संचालक राजकीय पाठबळामुळे सहीसलामत फिरताना दीसून येतात.अशा घटना रोखण्यासाठी राज्य शासनाने लेखा परीक्षण विषयक कायदे कडक केले तर मान्यताप्राप्त लेखा परीक्षकांचे अहवाल तक्रार प्राप्त झाल्यास तपासून पाहण्यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था तयार केली.मात्र कधी कधी तपासणी अहवाल देण्यासाठी असे लेखापरीक्षकच लाचाखोरी करत असल्याचे दिसून आले आहे.

  असाच प्रकार नगर जिल्ह्यातील वसंतदादा पतसंस्थेच्या बाबत घडला होता.या पतसंस्थे विरोधात सहकार विभागाकडे दाखल तक्रारी बाबत अहवाल देण्यासाठी सहकारी संस्था विशेष लेखा परीक्षक अनंत सुरेश तरवडे याने ३० हजार लाचेची मागणी करत हि रक्कम स्वीकारताना त्यास लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले होते. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश अहमदनगर यांच्यासमोर होऊन लाचखोर लेखा परीक्षक आरोपी अनंत सुरेश तरवडे यास ४ वर्षे सश्रम कारावास व ५० हजाराचा दंड ठोठावला आहे.     

            लाच लुचपत विभागाने सापळा रचून लाचखोरास लाच घेताना रंगेहात पकडले अशा बातम्या आम्ही वर्षांतून शेकडो वेळा लावतो पण एखाद्या लाचखोरीच्या प्रकरणात अगदी मोबाईल संभाषण,प्रत्यक्ष लाच स्वीकारताना सापळा लावून पडकने अशी कारवाई होऊन देखील एखाद्या लाचखोरीच्या आरोपीस शिक्षा झाल्याची बातमी छापण्याची संधी चुकून माकून मिळते एवढे मात्र निश्चित. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *