गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तळघरात 650 लॉकर, कोट्यवधी रुपये जप्त; नोएडामध्ये माजी IPS च्या घरावर छापे

संसदेत मंगळवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पामुळे अनेकांचे बजेट कोलमडले असले तरी काहीजण कोरोना काळातही मालामाल झाले आहेत. गैरमार्गाने मालमाल झालेल्यांवर आयकर विभागाची नजर आहे.

आयकर विभागाने नोएडामधील माजी सनदी अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी आढळलेल्या कोट्यवधींच्या रकमेने अधिकारीही चक्रावले आहेत.

नोएडातील माजी सनदी अधिकारी आर.एन. सिंह यांच्या घरावर गेल्या 3 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. त्यात कोट्यवधींची रक्कम सापडली आहे. सिंह यांचा मुलगा त्यांच्याच घरात असलेल्या तळघरामध्ये खासगी लॉकरची फर्म चालवतो. हे लॉकर भाड्याने दिले जातात. आयकर विभागाने तळघरात तपासणी केली असता या लॉकरमध्ये कोट्यवधींची रक्कम सापडली आहे.

हे पैसे कोणाचे आहेत, याबाबतची माहिती मिळालेली नाही. अजूनही आयकर विभागाची छापेमारीची कारवाई सुरुच आहे. तळघरात एकूण 650 लॉकर असून त्यात कोट्यवधींची संपत्ती सापडली आहे. आर.एन. सिंह उत्तर प्रदेशात डीजी अभियोजन होते. ही फर्म आपला मुलगा चालवत असून आपला त्याच्याशी संबंध नसल्याचे सिंह यांनी सांगितले.

ही फर्म आपला मुलगा चालवत असून तो कमीशनवर हे लॉकर देतो. त्याच्यात आपले 2 लॉकर असून त्यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीही सापडलेले नाही. मी सध्या गावात राहत असून घरी आयकर विभागाचा छापा पडल्याचे समजताच आपण येथे आल्याचे सिंह यांनी सांगितले.

आपण माजी सनदी अधिकारी असून माझा मुलगा येथे राहतो. आपण कधीकधी येथे येऊन राहतो. माझा मुलगा येथेच तळघरात खासगी लॉकरची फर्म चालवतो. तो बँकांपेक्षा चांगली सुविधा देत असल्याने येथे अनेकांचे लॉकर असल्याचे त्यांनी सांगितले.

तळघरातील एकूण 650 लॉकरपैकी आपले दोन आहेत. येथील सर्व लॉकरची आयकर विभागाचे अधिकारी तपासणी करत आहेत. येथे सापडलेली रक्कम आणि दागिने यांची सर्व माहिती आमच्याकडे आहे. या सर्व व्यवहारांचे आणि लॉकरचे दस्तावेज आमच्याकडे असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

तसेच आमच्या खासगी मालमत्तेचे आणि संपत्तीचे दस्तावेजही आपल्याकडे असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *