गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खळबळजनक! जागरणाला गेलेल्या विवाहितेसोबत घडलं विपरीत, अर्धनग्नावस्थेत शेतात आढळला मृतदेह

जागरणाच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडलेल्या विवाहित महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित महिला जागरणाच्या कार्यक्रमासाठी गेली होती, पण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ती घरी परतलीच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी जवळच्याच एका शेतात तिचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. संबंधित घटना राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील जुनाद गावातील आहे. येथील विवाहित महिला रविवारी सायंकाळी जागरणाच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडली होती.

पण सोमवारी सकाळपर्यंत ती घरी परत आली नाही. दरम्यान जवळच्याच एका शेतात तिचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळून आला आहे. एका स्थानिक व्यक्तीने हा मृतदेह पाहिल्यानंतर, या घटनेची माहिती गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली. यावेळी गावातील शेकडो जणांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आहे. एकंदरीत मृतदेहाची अवस्था पाहता संबंधित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली असावी, असा संशय गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *