अतिवृष्टी, हमीभाव या संकटांचा सामना करत असतानाच शेतकऱ्यांवर आणखी एक संकट चालून आलं आहे. महावितरणच्या बेभरवशाच्या काराभारामुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतात आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शॉर्टसर्किटमुळं ऊसाच्या शेतात आग लागल्याच्या घटना राज्यभरात घडत आहेत. जालना जिल्ह्यातही ६२ एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळं आग लागून ६२ […]
ताज्याघडामोडी
लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाची झडप, भीषण अपघातात 9 जणांचा चिरडून मृत्यू
लग्नासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळानं घाला घातला आहे. लग्न उरकून घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, या घटनेत कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये एका बालकासह सहा महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. […]
महावितरणचे बनावट संकेतस्थळ तयार करून वीजबिलाची वसुली
महावितरणचे बनावट संकेतस्थळ तयार करून वीज बिलाची रक्कम उकळणाऱ्या ठगाला पोलिसांनी अटक केली आहे. वीज बिल थकीत असलेल्या ग्राहकाला हेरून ते भरण्यासाठी मोबाईलवर एसएमएसद्वारे लिंक पाठवली जात होती. सदर लिंक ओपन केली असता हुबेहूब महावितरणचे संकेतस्थळ ओपन होते. त्यावर वीज बिलाची रक्कम भरली असता ती महावितरणच्या खात्यात न जाता भलत्याच खात्यात जात होती. याप्रकरणी पोलिसांनी […]
शिवसेनेच्या खासदारांच्या गाडीला तुळजापूर नजीक अपघात
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. खासदार निंबाळकर एका लग्न सोहळ्यासाठी जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी चव्हाणवाडी गावाच्या हद्दीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटर सायकलने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गाडीला जोराची धडक दिली. सुदैवाने अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसंच या अपघातामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर, चालक, खासदार निंबाळकर […]
एसटी संप सुरूच राहणार; विलीनीकरणाबाबत कामगार ठाम
एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने विलीनीकरणाबाबत अहवाल सादर करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत तोंडी मागितल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आणखी काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार […]
परीक्षेसाठी दुचाकीवरुन लगबगीने निघाली विद्यार्थिनी; रस्त्यातच चायनीज मांजाने चर्रकन कापला गळा
यवतमाळ जिल्ह्यातील वणी याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सराव परीक्षा देण्यासाठी आपल्या मैत्रिणीसह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत विपरीत घटना घडली आहे. शाळेत जात असताना वाटेतच चायनीज मांजामुळे तिचा गळा चिरला आहे. संबंधित घटना घडताच संबंधित विद्यार्थिनी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यावेळी आसपासच्या लोकांनी तातडीने तिला रुग्णालयात नेल्याने तिचा जीव वाचला आहे. जखम शिवण्यासाठी तिच्या […]
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
राज्य सरकारने सोमवार सात फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार सहा फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला […]
महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड
अमेरिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समजाकंटकांनी तोडफोड केली आहे. या घटनेवर अमेरिकास्थित भारतीय समुदायाने संताप व्यक्त केला आहे. तर, भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबाबत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. अमेरिकेतीय न्यूयॉर्क येथील मॅनहॅटन मध्ये महात्मा गांधी यांच्या कांस्यचा पुतळ्याची समाजकंटकांनी तोडफोड केली. भारताच्या वाणीज्य दुतावासाने म्हटले की, या प्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडे […]
युग संपले, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन
हिंदुस्थानी संगीत विश्वातला एक अढळ ध्रुवतारा, हिंदुस्थानच्या स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. सकाळी 8.12 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर नुकत्याच कोरोनातून बऱ्या झाल्या होत्या. लतादीदींना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार […]
प्रेयसीच्या मागण्या संपत नव्हत्या म्हणून तिलाच संपवलं; फिरायला घेऊन जात केली हत्या
महिनाभरापूर्वी मुंबईतील सांताक्रूझ येथून बेपत्ता झालेल्या 29 वर्षीय तरुणीच्या हत्येचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी विले पार्लेतून तिच्या प्रियकराला आणि एका साथीदाराला अटक केली आहे. आरोपी प्रियकराला अटक केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून प्रेयसी सतत महागडे गिफ्ट्स आणि फिरायला घेऊन जाण्याचा हट्ट करत होती. त्यामुळे तिची हत्या केल्याचं आरोपीनं सांगितलं […]











