ताज्याघडामोडी

परीक्षेसाठी दुचाकीवरुन लगबगीने निघाली विद्यार्थिनी; रस्त्यातच चायनीज मांजाने चर्रकन कापला गळा

यवतमाळ जिल्ह्यातील वणी याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सराव परीक्षा देण्यासाठी आपल्या मैत्रिणीसह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत विपरीत घटना घडली आहे.

शाळेत जात असताना वाटेतच चायनीज मांजामुळे तिचा गळा चिरला आहे. संबंधित घटना घडताच संबंधित विद्यार्थिनी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यावेळी आसपासच्या लोकांनी तातडीने तिला रुग्णालयात नेल्याने तिचा जीव वाचला आहे. जखम शिवण्यासाठी तिच्या गळ्याला तब्बल 10 टाके घालावे लागले आहेत.

नुश्री विलास पारखी असं जखमी झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती वणी शहरातील जैन लेआऊट परिसरातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी तिची शाळेत सराव परीक्षा होती. त्यामुळे सकाळी आठच्या सुमारास ती घरातून तिची दुचाकीने शाळेकडे निघाली होती.

वाटेत तिने आपल्या मैत्रिणीला देखील सोबत घेतलं. दरम्यान आवारी लेआऊट परिसरातील रस्त्यावरून जात असताना, पंतगाचा चायनीज मांजा तिच्या गळ्याभोवती अडकला.

पुढच्याच सेकंदात धारदार चायनीज मांजामुळे तिचा गळा कापला गेला. यात दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या तनुश्रीला तातडीने वणी येथील सुगम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

पण तिचा रक्त प्रवाह सुरूच होता. अशा स्थितीत रक्तप्रवाह थांबवण्यासाठी डॉक्टरांना तनुश्रीच्या गळ्यावर तब्बल 10 टाके घ्यावे लागले आहेत. यावरून चायनीज मांजा किती धारदार होता. याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *