ताज्याघडामोडी

महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड

अमेरिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समजाकंटकांनी तोडफोड केली आहे. या घटनेवर अमेरिकास्थित भारतीय समुदायाने संताप व्यक्त केला आहे. तर, भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबाबत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

अमेरिकेतीय न्यूयॉर्क येथील मॅनहॅटन मध्ये महात्मा गांधी यांच्या कांस्यचा पुतळ्याची समाजकंटकांनी तोडफोड केली. भारताच्या वाणीज्य दुतावासाने म्हटले की, या प्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडे तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी या घृणास्पद कृत्यासाठी जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच, अमेरिकेतील भारतीय समुदायाची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याप्रकरणी भ्याड कृत्याचा तीव्र निषेध केला आहे.

गांधी मेमोरियल इंटरनॅशनल फाउंडेशनने गांधीजींची ही आठ फुटांची प्रतिमा दान दिली होती. महात्मा गांधी यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर १९८६ या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. 2001 साली हा पुतळा हटवण्यात आला होता. मात्र, 2002 मध्ये त्याची पुनर्रस्थापना केली होती.

दरम्यान, मागील वर्षी सुद्धा काही अज्ञात समाजकंटकांनी कॅलिफोर्निया राज्यात गांधीजींच्या पुतळ्याची विंटबना केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *