पिंपरी चिंचवड हे गुन्हेगारीचे केंद्र बनत असल्याचे पहायला मिळत आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. पिंपरी परिसरातील रामनगर चौकात उभ्या असलेल्या सराईत गुन्हेगाराची गोळीबार आणि त्यानंतर त्याच्यावर सपासप वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात हा सराईत जागेवरच ठार झाला आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे. […]
ताज्याघडामोडी
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर विधानभवनावर राष्ट्रवादीचा १ लाख लोकांचा मोर्चा, शरद पवार करणार नेतृत्व
शेतकऱ्यांचे प्रश्न, पीकविम्याचा मुद्दा, गगनाला भिडलेली महागाई आणि राज्यपालांची सततची वादग्रस्त विधाने या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आक्रमक पवित्रा घेऊन सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला घेरणार आहे. ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर तब्बल १ लाख लोकांचा मोर्चा काढून शिंदे-फडणवीसांना विविध प्रश्नांवरुन लक्ष्य करेल. विरोधी पक्षाचा […]
मित्र बनला शत्रु, फिरवून आणण्याच्या बहाण्याने आठ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत असतानाच माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बिसरख पोलीस ठाण्याअंतर्गत एका 57 वर्षीय नराधमाने आठ वर्षींच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. घर बदलण्याच्या कामात व्यग्र असल्याने मुलीच्या वडिलांनी विश्वासाने तिला आपल्या मित्राच्या घरी सोडलं होतं. परंतु, विश्वासघात करत त्याने मुलीवर अत्याचार केला. विश्वासावर जगातील सर्व गोष्टी अवलंबून […]
सरकारची नवी व्यवस्था , कॉल करणाऱ्याचा फोटो आणि मोबाईल नंबर दिसणार
मोबाईल कॉल करून त्यांच्या मदतीने आर्थिक फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. खोट्या नंबरवरून असे कॉल करून लोकांना मोठ्या प्रमाणावर फसविले जात आहे आणि बँक फ्रॉड केले जात आहेत. हे बनावट कॉल पकडणे अवघड आहे. यामुळे केंद्र सरकार आणि ट्रायने कॉलिंग मध्ये मोठे बदल केले असून ट्रायने त्यासाठी नवी व्यवस्था सादर केली आहे. यामुळे कॉल […]
सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. याबाबत सहकार विभागाने आदेश प्रसृत केले आहेत.ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरू आहेत. तसेच अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या अधिक आहे. या सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेच मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. […]
प्रेयसीसोबत राहू देत नाहीत,जिल्हाधिकाऱ्यांनाच लिहले पत्र
प्रेमवीर सरपंचाने केले विष प्राशन दोघांचे प्रेम आहे, आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, आम्हाला त्रास देत असल्याची तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे करीत प्रेमवीर सरपंच याने विष प्राशन केल्याची घटना घडली असून अ.नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी या गावाचा सरपंच राहिल्याचे समजते. अविनाश हा या गावचा सरपंच झाला. त्यानंतर त्याचं गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध जुळले. […]
गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील सव्वादोन लाख कुटुंबांच्या घरावरील तूर्तास संकट टळले गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात एक दहशत पसरली होती. त्याला कारण होता एका आदेश. गायरान जमिनीवरील अतिक्रिमण हटवण्यासंदर्भात गावागावात नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, गायरान जमीनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत असा निर्णय आज राज्य घेतला आहे. राज्यातील सुमारे सव्वादोन लाख कुटुंबांना याचा फायदा मिळणार […]
लग्नात नाचताना तोल गेला,काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं
लग्न सोहळ्यात नाचताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात ४० वर्षीय व्यक्ती इतर नातेवाईकांसोबत नाचताना दिसत आहे. नाचता नाचता अचानक ते खाली कोसळतात. बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. वाराणसीच्या पिपलानी कटरा औघडनाथ जवळ २५ ऑक्टोबरला एक लग्न होतं. त्यात ४० वर्षीय मनोज […]
पत्नीच्या प्रियकराची दृश्यम स्टाईल हत्या; निर्घृणपणे संपवून पुरलं, पण एका चुकीमुळे सापडला
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हादरला. २६ वर्षीय श्रद्धाची तिचा प्रियकर आफताब पुनावालानं निर्घृण हत्या केली. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. आफताबविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. आफताबनं हत्येआधी दृश्यम चित्रपट पाहिला होता. तशी माहिती त्यानं पॉलिग्राफनं टेस्टमध्ये दिली. अशीच काहीशी घटना गुजरातच्या राजकोटमध्ये घडली. दृश्यम चित्रपट पाहून एका तरुणाची […]
सोलापुर-तुळजापुर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी ४५२ कोटी मंजूर
पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गासाठी अद्याप तरी ‘वेटिंग’ सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ४५२ कोटी ४६ लाख रुपये मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.राज्य शासनाच्या या निर्णयामुळे यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र हे रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.मागील अनेक वर्षांपासून रखडलेले हे काम आता वेगाने हाती घेतले जाईल असे दिसून येत आहे.तर सोलापूर आणि […]











