मोबाईल कॉल करून त्यांच्या मदतीने आर्थिक फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. खोट्या नंबरवरून असे कॉल करून लोकांना मोठ्या प्रमाणावर फसविले जात आहे आणि बँक फ्रॉड केले जात आहेत. हे बनावट कॉल पकडणे अवघड आहे. यामुळे केंद्र सरकार आणि ट्रायने कॉलिंग मध्ये मोठे बदल केले असून ट्रायने त्यासाठी नवी व्यवस्था सादर केली आहे. यामुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि फोटो कॉल घेणार्याला पाहता येणार आहे. यासाठी मोबाईल नंबर केवायसी लागू केले गेले आहे.
यात दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात आधार आधारित मोबाईल आणि दुसरा सिम कार्ड आधारित मोबाईल येतील. ट्रायच्या नव्या व्यवस्थेनुसार सर्व मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक केले जात आहेत. कॉल येताच समोरच्या व्यक्तीला मोबाईल नंबर आणि कॉल करणारी व्यक्ती दिसेल. आधार कार्डवरचे नाव सुद्धा दिसेल.
सिम कार्ड खरेदी करताना जी कागदपत्रे घेतली जातात, त्यावरून फोटो कॉलिंगला जोडला जाणार आहे. यामुळे बनावट कॉल ओळखणे सुलभ होणार आहे. अर्थात सिम खरेदी करताना जो फोटो असेल तीच व्यक्ती दिसेल. कॉल घेण्यापूर्वी त्या व्यक्तीचे नाव कळणार आहे. यामुळे कॉल करणारा कुणीही त्याची ओळख लपवू शकणार नाही. परिणामी फसवणुकीला बराच आळा घालणे शक्य होणार आहे.