ताज्याघडामोडी

प्रेयसीसोबत राहू देत नाहीत,जिल्हाधिकाऱ्यांनाच लिहले पत्र

प्रेमवीर सरपंचाने केले विष प्राशन 

दोघांचे प्रेम आहे, आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, आम्हाला त्रास देत असल्याची तक्रार  थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे करीत प्रेमवीर सरपंच याने विष प्राशन केल्याची घटना घडली असून अ.नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील  घोटवी या गावाचा  सरपंच राहिल्याचे समजते.

       अविनाश  हा या गावचा सरपंच झाला. त्यानंतर त्याचं गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध जुळले. या प्रकरणाची गावात चर्चा होऊ लागल्यानंतर विवाहितेच्या पतीने आणि त्याच्या घरच्यांनी यास विरोध केला.संबंधित महिलेला पतीने माहेरी पाठवून दिले. माहेरी गेल्यानंतर आपल्याला मारहाण होत असल्याची तक्रार महिलेने प्रेमी सरपंच अविनाश  यांच्याकडे केली. त्यानंतर म्हणाले दोघांचे प्रेम आहे, आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, आम्हाला त्रास देत असल्याची तक्रार करण्यासाठी प्रेमवीर सरपंच अविनाश यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. 
    आम्हाला सोबत राहू देत नाही, असं म्हणत अविनाश  याने कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्याला स्थानिक दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मात्र या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *