ताज्याघडामोडी

सोलापुर-तुळजापुर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी ४५२ कोटी मंजूर

पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गासाठी अद्याप तरी ‘वेटिंग’   

सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ४५२ कोटी ४६ लाख रुपये मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.राज्य शासनाच्या या निर्णयामुळे यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र हे रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.मागील अनेक वर्षांपासून  रखडलेले हे काम आता वेगाने हाती घेतले जाईल असे दिसून येत आहे.तर सोलापूर आणि मराठवाडा यांना जोडणारा आणखी एक पर्यायी रेल्वे मार्ग उपलब्ध झाल्याने रेल्वे प्रवाशांची देखील मोठी सोय होणार आहे.या प्रकल्पासाठी ९०४ कोटी ९२ लाख इतका खर्च येणार असून ५० टक्के सहभाग राज्य शासनाचा आहे.
  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ४ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर्स अँड डिस्टलरीजच्या प्रथम गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी आले असता आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना खासदार रणजितसिह निंबाळकर यांच्या पाठपुराव्याची दखल घेत लवकरच राज्य शासन पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गाच्या कामासाठी देखील आपला निधीचा वाटा देईल व हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल अशी घोषणा केली होती.पंढरपूर-फलटण -लोणंद हा रेल्वे मार्गही मागील ४० वर्षांपासून प्रतीक्षेत होता.खासदार रणजितसिह निंबाळकर यांच्या पाठपुराव्या नंतर लोणंद ते फलटण या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले.मात्र फलटण -पंढरपूर या मार्गासाठी मात्र अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे असेच म्हणावे लागेल.
 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *