ताज्याघडामोडी

मागविला मोबाइल, आला फक्‍त चार्जर;ऍमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल

एका व्यक्तीने ऍमेझॉन कंपनीकडून ऑनलाइन माध्यमातून मोबाइल खरेदी केला. मात्र पार्सलमध्ये केवळ चार्जर आणि केबलच ग्राहकाला मिळाली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला. विपुल विनोद पाटणी (वय 33, रा. फेज 1, हिंजवडी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऍमेझॉन कंपनी, डिलिव्हरी देणारे कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात भारतीय दंड […]

ताज्याघडामोडी

कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार? दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदावर आणि प्रत्येक राजकीय हालचालीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची बारीक नजर होती. याचा राजकीय फायदा घेण्यासाठी आतुरलेल्या भाजपने आपला पहिला डाव टाकला असून त्याचाच एक भाग म्हणून आज कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली आहे. गेल्या आठ महिन्यापासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका पंजाबमध्ये भाजपला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रिक्षा चालकाने पोलिसाच्या अंगावर घातली रिक्षा, कर्मचारी गंभीर जखमी

पुणे शहरातील धानोरी परिसरात गुंडप्रवृत्तीच्या एका रिक्षाचालकाने पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालून त्यांना गंभीर जखमी केले. त्याशिवाय रिक्षाची धडक देउन सरकारी दुचाकीचेही नुकसान केले आहे. घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला. जखमी कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस शिपाई दीपक राजमाने (वय 45) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार गणेश शिरसाट यांनी विश्रांतवाडी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याला 45 लाखांचा गंडा

व्यवसायासाठी 10 लाखाचे कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करून बँक मॅनेजरसह तिघांनी मिळून एका शेतकऱ्याची 45 लाखांची फसवणूक केली आहे. आरोपींनी शेतकऱ्याच्या कर्ज प्रकरणासह कोऱ्या धनादेशावर सह्या घेऊन 45 लाखांचे कर्ज मंजूर करून घेत फसवणूक केली. लबाडीने कर्ज घेणाऱ्या बँकेचा तत्कालीन व्यवस्थापक अजय प्रसाद, प्रकाश विठ्ठल पाटील, स्वानंद प्रकाश पाटील, परिमल प्रकाश पाटील अशी गुन्हा दाखल […]

ताज्याघडामोडी

देशाच्या ग्रामीण भागात 44 टक्के लोकसंख्या OBC प्रवर्गाची

जातीआधारित जनगणनेची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. यादरम्यान अशी माहिती हाती आली आहे, की देशातल्या ग्रामीण भागातल्या 17.24 कोटी कुटुंबांपैकी 44 टक्के लोकसंख्या ओबीसी तमिळनाडू, बिहार, तेलंगण, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि छत्तीसगड या सात राज्यांतल्या ग्रामीण भागांमध्ये ओबीसी कुटुंबांची संख्या सर्वांत जास्त आहे. लोकसभेच्या 543पैकी 235 जागा जिंकण्याचा मार्ग या ग्रामीण भागातल्या व्होटबँकेतून […]

ताज्याघडामोडी

राज्यातील कॉलेज 1 महिना लांबणीवर, कोरोनामुळे वेळापत्रक पुढे ढकलण्याचा सरकारचा निर्णय

नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय सध्याची कोरोनास्थिती लक्षात घेता राज्य करकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक म्हणजेच कॉलेज सुरु होण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना […]

ताज्याघडामोडी

मोहोळ येथे भूसंपादन कक्ष सुरु प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी व गुरुवारी सुरु राहणार कक्ष  प्रांताधिकारी गजानन गुरव यांची माहिती

मोहोळ येथे भूसंपादन कक्ष सुरु प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी व गुरुवारी सुरु राहणार कक्ष  प्रांताधिकारी गजानन गुरव यांची माहिती                   पंढरपूर दि. (28):-  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 मोहोळ –पंढरपूर-आळंदी पालखी मार्गासाठी मोहोळ  तालुक्यातील 1 लाख 4 हजार 900 चौ.मी क्षेत्र संपादित होत आहे. तालुक्यातील बाधित खातेदारांच्या सोयीसाठी तसेच आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी तहसिल कार्यालय, मोहोळ येथे  प्रत्येक […]

ताज्याघडामोडी

शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द, 1 ऑक्टोंबरपासून शिवभोजन थाळी पूर्वीप्रमाणे 10 रूपयाला

राज्यात कोरोनाचे आकडे कमी होत असताना आता राज्यात सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना 15 एप्रिल पासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून […]

ताज्याघडामोडी

जैन समाजाच्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय तपस्वी सन्मान 2021 ची यादी जाहिर

जैन समाजाच्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय तपस्वी सन्मान 2021 ची यादी जाहिर,3 ऑक्टोबरपासून नवकार टीव्हीवर प्रसारित केली जाईल, भारतासह हाँगकाँग, बँकॉक,147 हून अधिक तपस्वींना सन्मानित केले जाईल इंदूर :नवकार शीर्षक सजावट (नवकार महोत्सव) नंतर नवकार महामंत्र टाइम्सने,आता “आंतरराष्ट्रीय नवकार तपस्वी सन्मान” समारंभ आयोजित केला जात आहे, या कार्यक्रमात सकल जैन समाजाच्या देशासह परदेशात राहणाऱ्या तपस्वींचा आभासी […]

ताज्याघडामोडी

उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेल काँग्रेसवाले जिवंत झाले

उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेल काँग्रेसवाले जिवंत झाले असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी केले आहे. आमदार आशीष जयस्वाल यांनी महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेस पक्षांना डिवचलं आहे. त्यामुळे आशीष जयस्वाल यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आशीष जयस्वाल यांनी हे […]