ताज्याघडामोडी

राज्यातील कॉलेज 1 महिना लांबणीवर, कोरोनामुळे वेळापत्रक पुढे ढकलण्याचा सरकारचा निर्णय

नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय

सध्याची कोरोनास्थिती लक्षात घेता राज्य करकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक म्हणजेच कॉलेज सुरु होण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलले आहे. 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केलेली आहे. मात्र, या अधिनियमात निर्देशित केल्याप्रमाणे कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ शकणार नाही.

याच कारणामुळे हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.
राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार 

दरम्यान, राज्य करकारने कॉलेज एका महिन्याने उशिराने सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या चार ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. तसा निर्णय ठाकरे सरकराने घेतला आहे. राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता.

मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण  झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *