गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गाडी घासल्याचा जाब विचारल्यामुळे वकिल महिलेसह पतीवर कोयत्याने वार

मोटारीला गाडी घासल्याचा जाब विचारल्याचा राग आला म्हणून वकील महिलेसह पतीवर त्रिकुटाने कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना आंबेगाव बुद्रुक येथील जय शिवाजी मंडळ येथे घडली. याप्रकरणी रितेश कोंढरे (रा.बिबवेवाडी) आणी त्याच्या दोन साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी 28 वर्षीय महिला वकील […]

ताज्याघडामोडी

पुण्यात तुफान पाऊस शहरात विविध ठिकाणी पाणी साठले

मुसळधार पावसानं पुणेकरांना चांगलंच झोडपून काढलं आहे. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी सांचलं आहे. भुयारी मार्गात पाणी साचल्यानं तिथे असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं नागरिकांनी पाऊस थांबल्याशिवाय घराबाहेर पडू नका, तसंच घरात असाल तर बाहेर पडू नका असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाऊन परतला; ६१ गावे पुढचे १० दिवस बंद

राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग घटत असताना नगर जिल्ह्यात मात्र चिंता कायम आहे. नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या गावांमध्ये ४ ते १३ ऑक्टोबरपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. त्यामुळे तेथील शाळा […]

ताज्याघडामोडी

आजादी का अमृत महोत्सवाचे’आयोजन :  पंढरपुरात रॅली

आजादी का अमृत महोत्सवाचे’आयोजन :  पंढरपुरात रॅली                     पंढरपूर दि. (30) :- ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत  आज दिनांक 02  ऑक्टोबर  रोजी गांधी जयंती निमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदीर येथील नामदेव पायरी पासून शिवाजी चौक  पर्यंत रॅली काढण्यात आली.              ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत जिल्हा न्यायाधिश  एम. बी. लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली व सह-दिवाणी न्यायाधीश ए. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मागवला मोबाईल अन् पार्सलमध्ये निघाले कांदे, बटाटे, लाडू

फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झालेल्या एका भामट्याने स्वस्तात मोबाईल देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाला फसवले आहे. वन प्लस-९ प्रो या मोबाईलसाठी व्यावसायिकाने भामट्याला १८ हजार रुपये दिले. मात्र त्याने त्यांना मोबाईल पाठवण्या ऐवजी कांदे, बटाटे आणि लाडूचे पार्सल पाठवले आहे. या फसवणूक प्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी या फेसबुक फ्रेंडच्या मुसक्या आवळल्या आहेत. हितेश जैन यांचे मोबाईल […]

ताज्याघडामोडी

आझादी का अमृतमहोत्सव निमित्त कायदेविषयक जागृती  

आझादी का अमृतमहोत्सव निमित्त कायदेविषयक जागृती                   पंढरपूर दि. (01):-  आझादी का अमृतमहोत्सव या निमित्त दिनांक 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून  कायदेविषयक जागृती करण्यासाठी तालुका वकील बार असोसिएशन व पंचायत समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश एम.बी. लंबे […]

ताज्याघडामोडी

अमरिंदर सिंग यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, कॅप्टन यांच्या टीममध्ये इतके आमदर व खासदार

पंजाबमधील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. काँग्रेसमधील अपमानाने दुखावलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विटरवर ही आपली ओळख बदलली असून त्यात काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला आहे. स्वत:ला माजी सैनिक, पंजाबचे माजी मुख्यमंत्री म्हणून वर्णन करताना कॅप्टन यांनी लिहिले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलीस उपनिरीक्षक रंगेहाथ लाचलुचपतच्या जाळ्यात; 4 लाखांची मागितली होती लाच

मोठ्या लाचप्रकरणात बड्या पोलीस अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं आहे. नाशिक ग्रामीणचा एलसीबी पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे याला तब्बल 4 लाखांच्या लाच प्रकरणात ताब्यात घेण्यात आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे मी धमकी देत नाही, मात्र मागणी जरूर करतो; शिवसेनेच्या आरोपांवर भुजबळांचा विनंतीवजा इशारा बुकींच्या अड्ड्यावर छापा टाकण्याच्या बहाण्याने त्यानं तिथंच सेटलमेंट चालू केली […]

ताज्याघडामोडी

त्रिसदस्यीय प्रभाग रचनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली भूमिका

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी कान टोचले आहेत. आघाडी सरकार चालवत असताना निर्णय होत नाही, तोपर्यंत सर्वांनी भूमिका मांडायची असते, पण एकदा निर्णय झाला की सर्वांनी समाधानी राहायचे असते, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यांनी यातून प्रभाग रचनेवरुन नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मुंबईत पत्रकारांशी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अल्पवयीन मुलाच्या खूनाचा प्रयत्न, दोघांना अटक

पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी साताNयातून अटक केली. त्यांच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले. ही घटना दिनांक 23 सप्टेंबरला पावणेदहाच्या सुमारास पेट्रोलपंपाजवळ घडली होती. अभिषेक अनिरूध्द लोंढे( वय 19,रा.नऱ्हे), आकाश तानाजी शिंदे (वय 25,रा.खेडशिवापूर) यांना अटक करण्यात आली. जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्याने फिर्यादी अल्पवयीनाला गाठून कोयत्याने वार केला. […]