ताज्याघडामोडी

आझादी का अमृतमहोत्सव निमित्त कायदेविषयक जागृती  

आझादी का अमृतमहोत्सव निमित्त कायदेविषयक जागृती

 

                पंढरपूर दि. (01):-  आझादी का अमृतमहोत्सव या निमित्त दिनांक 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून  कायदेविषयक जागृती करण्यासाठी तालुका वकील बार असोसिएशन व पंचायत समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश एम.बी. लंबे यांनी सांगितले.

            आझादी का अमृतमहोत्सवा निमित्त शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातंर्गत कायद्याविषयक जागृती करण्याबरोबरच  शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असून,  पॅन इंडीया जनजागृती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी विठ्ठल मंदीर परिसर ते शिवाजी चौक येथे  सकाळी 8.30 वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  दि. 03 ऑक्टोबर रोजी  ग्रामपंचायत, शेगांव दुमाला येथे सकाळी 10.00 वाजता , दि. 04 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे  दुपारी 2.00 वाजता, दि. 05ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत, वाखरी दुपारी 2.00 वाजता , दि. 06ऑक्टोबर रोजी  ग्रामपंचायत, चिचुंबे येथे  दुपारी 2.00 वाजता, दि. 07 ऑक्टोबर रोजी  तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे दुपारी 2.00 वाजता  तर दि. 08 ऑक्टोबर रोजी  पंचायत समिती कार्यालय, पंढरपूर येथे दुपारी 2.00 वाजता कायर्क्रमाचे आयोजन केले असल्याचे जिल्हा न्यायाधिश एम.बी. लंबे यांनी सांगितले.

            या कार्यक्रमातंर्गत कायद्यासंबधी जागृती करण्याबरोबरच विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात येणार असल्याने जास्ती-जास्त नागरिकांना  या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा न्यायाधिश एम.बी.लंबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *