ताज्याघडामोडी

अमरिंदर सिंग यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, कॅप्टन यांच्या टीममध्ये इतके आमदर व खासदार

पंजाबमधील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. काँग्रेसमधील अपमानाने दुखावलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे.

एवढेच नाही तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विटरवर ही आपली ओळख बदलली असून त्यात काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला आहे. स्वत:ला माजी सैनिक, पंजाबचे माजी मुख्यमंत्री म्हणून वर्णन करताना कॅप्टन यांनी लिहिले आहे की, ते राज्यातील जनतेची सेवा करत राहतील.’

पंजाबची सुरक्षा माझी पहिली प्राथमिकता: कॅप्टन अमरिंदर सिंग

अमरिंदर सिंग दिल्लीत 2 दिवस राहिल्यानंतर चंदीगडला परतले आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, ‘पंजाबची सुरक्षा ही माझी पहिली प्राथमिकता आहे. काँग्रेसचा माझ्यावर विश्वास नाही, म्हणूनच मी काँग्रेस सोडत आहे. वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारून काँग्रेसची घसरण होत आहे. काँग्रेसने माझ्यावर विश्वास ठेवला नाही.’

जर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबमध्ये काँग्रेस पक्ष तोडला तर 4 काँग्रेस खासदारांसह सुमारे 20 ते 25 आमदार देखील कॅप्टन यांच्यासोबत जाऊ शकतात. प्रनीत कौर, गुरजीत सिंग औजला, मनीष तिवारी, मोहम्मद सादिक हे कॅप्टन गटातील नेते असल्याचे सांगितले जाते. कॅप्टन यांच्या राजकीय प्रवासाबाबत बोलायचे झाले तर 2002 आणि 2017 मध्ये कॅप्टन यांनी पंजाबमध्ये स्वतः सरकार बनवले आणि 2014 मध्ये मोदी लाटेत जेटलींचा पराभव केला. 52 वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग सुमारे साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री होते.

अमरिंदर सिंग यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. मात्र, अमरिंदर सिंग यांच्या कार्यालयातून हे स्पष्ट करण्यात आले आहे की ते भारतीय जनता पक्षात सामील होणार की नाहीत. काँग्रेस सोडण्याबाबत अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे की, पक्ष सातत्याने घसरत आहे आणि वरिष्ठ नेत्यांना बाजूला केले जात आहे. काँग्रेस पक्षातच त्यांचा अपमान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमित शहा यांच्या भेटीत काय घडले ?

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत असलेल्या कॅप्टन यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपमध्ये येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, कॅप्टन आणि शाह यांच्यात काय चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शाह यांना भेटल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी ट्विट करून लिहिले, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी चळवळीबद्दल चर्चा केली आणि कायदे रद्द करून, एमएसपीची हमी आणि पंजाबमधील पीक विविधीकरणाला समर्थन देऊन हे संकट तातडीने सोडवण्याचे आवाहन केले.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *