गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मागवला मोबाईल अन् पार्सलमध्ये निघाले कांदे, बटाटे, लाडू

फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झालेल्या एका भामट्याने स्वस्तात मोबाईल देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाला फसवले आहे. वन प्लस-९ प्रो या मोबाईलसाठी व्यावसायिकाने भामट्याला १८ हजार रुपये दिले. मात्र त्याने त्यांना मोबाईल पाठवण्या ऐवजी कांदे, बटाटे आणि लाडूचे पार्सल पाठवले आहे. या फसवणूक प्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी या फेसबुक फ्रेंडच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हितेश जैन यांचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून त्यांची भरत जैन याच्याबरोबर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीमध्ये झाले. आपण चांगल्या कंपनीचे मोबाईल स्वस्त दरात उपलब्ध करून देतो, अशी बतावणी भरत याने हितेश यांना केली. त्यानुसार त्यांनी वन प्लस-९ प्रो हा मोबाईल घेण्यासाठी त्याला १८ हजार रुपये दिले.

आपण कुरिअरने मोबाईल पाठवला असून या कंपनीचे कार्यालय उलवे येथे आहे असे भरतने हितेश यांना सांगितले. त्यानुसार हितेशने उलवे येथे धाव घेतली आणि मोबाईलचे पार्सल उघडले असता त्यामध्ये कांदे, बटाटे आणि लाडू निघाले. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल करून भरत याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *