गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अल्पवयीन मुलाच्या खूनाचा प्रयत्न, दोघांना अटक

पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी साताNयातून अटक केली. त्यांच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले. ही घटना दिनांक 23 सप्टेंबरला पावणेदहाच्या सुमारास पेट्रोलपंपाजवळ घडली होती.

अभिषेक अनिरूध्द लोंढे( वय 19,रा.नऱ्हे), आकाश तानाजी शिंदे (वय 25,रा.खेडशिवापूर) यांना अटक करण्यात आली.

जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्याने फिर्यादी अल्पवयीनाला गाठून कोयत्याने वार केला. याप्रकरणी आरोपी हे सातारा येथे पळून गेल्याची माहिती पोलीस अंमलदार हर्षल शिंदे व शिवदत्त गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन पथक तयार करुन त्यांना साताऱ्यातून ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत एक अल्पवयीन साथीदारही मिळून आला. त्यानेही गुन्हयात सहभागी असल्याची कबुली दिली.

ही कामगिरी उपायुक्त सागर पाटील, एसीपी सुषमा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, उप निरीक्षक अंकुश कर्चे रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *