ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात राजकीय इतिहासात पक्ष निष्ठेचे असे उदाहरण सापडणार नाही !

मतदानाला केवळ चार दिवस उरले होते,स्व.ऍड.राजाभाऊ पाटील यांच्या प्रचारासाठी कमर्वीर कै.अण्णा आणि त्यांचे काही जेष्ठ सहकारी सोडून सारा अण्णा गट पहिल्यांदाच स्व.अण्णांना दैवत मानत असूनही निवडणुकीच्या राजकारणात त्यांच्या सोबत नव्हता.मा.ब्रम्हदेव माने,विनायकराव पाटील आदी जिल्ह्यातील नेते अण्णांच्या सोबत असायचे पण त्यांनाही आतून काही तरी खटकू लागले होते पण बोलता येत नव्हते.तालुक्यातील गावोवाच्या प्रचार सभा संपवून पंढरपुर […]

ताज्याघडामोडी

23-24 नोव्हेंबरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा; शरद पवार, अजित पवार उपस्थित राहणार

  सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धूम सुरु आहे. आगामी काळात पुणे, मुंबई तसेच इतर मोठ्या शहरांतील  महापालिका निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणीसाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी महाबळेश्वरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हजेरी […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेने घेतला मोठा निर्णय; ‘त्या’ दोन पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी हटवले

शिवसेना पदाधिकारी गुन्ह्यांत अडकल्याने पक्षावरील टीका टाळण्यासाठी तातडीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एकाच दिवशी पक्षाने दोन पदाधिकाऱ्यांना दणका दिला. गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली तर बायोडिझेल प्रकरणात सूत्रधार म्हणून नाव आल्याने अहमदनगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. या पदांवर लवकरच नव्या व्यक्तींची निवड करण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आणखी एक हनीट्रॅप उघड; 17 वर्षांच्या मुलीने व्यापाऱ्याला लुटलं

कोल्हापूरच्या साखर व्यापाऱ्यास हनी ट्रॅपमध्ये अडकून त्यांच्याकडून सव्वातीन कोटींची खंडणी उकळल्याचा प्रकार ताजा असतानाच आज आणखीन एक अशीच घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने कोल्हापुरातील तरुण कापड व्यापाऱ्याला अडकवून सुमारे अडीच लाखाला गंडा घातला आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीला आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सागर माने (वय 32, रा. कळंबा. ता. […]

ताज्याघडामोडी

राज्यपालांच्या भेटीनंतर नाना पटोले शरद पवारांच्या बंगल्याकडे रवाना, राजकीय चर्चांना उधाण

राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर नाना पटोले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज संध्याकाळी नाना पटोले यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. […]

ताज्याघडामोडी

शेअर मार्केट जोरदार कोसळलं; गुंतवणूकदारांना आठ लाख कोटींचा फटका

आज आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी शेअर मार्केटची सुरुवात खराब झाली आहे. बीएसईचा सेन्सेक्स 287.16 च्या अंशांनी म्हणजेच 0.48 टक्क्यांच्या घसरणीसह 59,348.85 च्या स्तरावर उघडला. दुसरीकडे निफ्टी देखील घसरणीसह उघडला. दोन्हीही इंडेक्स लाल निशाण्यावर उघडल्यानंतर आज दिवसभरात देखील शेअर मार्केटमध्ये बरीच घसरण झालेली पहायला मिळाली. दिवसभराच्या चढउतारानंतर सेन्सेक्स आज 1170.12 अंशांनी म्हणजेच 1.96 टक्क्यांनी घसरला आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

इन्कम टॅक्सची मोठी धाड! 100 कोटींचा काळापैसा उघड; 16 बँक खाती सील, कोट्यावधींचे दागिणे आणि रोकड हस्तगत

गुजरातमध्ये आयकर विभागाने एका कंपनीवर छापे टाकून जवळपास 100 कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचा शोध लावला. याबाबतची माहिती सीबीटीडीने रविवारी दिली. आयकर विभागाने रसायनांची निर्मिती आणि रियल इस्टेटमध्ये कार्यरत एका कंपनीवर नुकतीच छापेमारी केली होती. या छाप्यात 100 कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेचा शोध लागला आहे. 18 नोव्हेंबर रोजी वापी, सरिगम (वलसाड जिल्हा), सिल्वासा आणि मुंबईतील जवळपास […]

ताज्याघडामोडी

निवडणुकीच्या तोंडावर तोडफोडीच्या राजकारणाला वेग

चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक ज्येष्ठ नेता भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून त्यांचा लवकरच प्रवेश होणार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या नेत्याने दोन आजी नगरसेवकांना व दोन माजी नगरसेवकांना भाजप प्रवेशासाठी गळ घातली आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेल्या या प्रयत्नामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येऊ लागला आहे. हा […]

ताज्याघडामोडी

माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर फेकले काळे ऑईल!

शिवसेनेचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते बबनराव घोलप यांच्या उपस्थितीत सोलापुरात झालेल्या समाज संघटनेच्या मेळाव्यात एका तरूणाने घोलप यांच्या अंगावर काळे आॕईल फेकले. संघटनेतील स्थानिक वादातून हा प्रकार घडला. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये राष्ट्रीय चर्मकार संघटनेचा मेळावा आयोजिला होता. त्यावेळी घोलप यांच्यासह काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या माजी सदस्या सुरेखा […]

ताज्याघडामोडी

विश्वास नांगरे पाटील यांच्यावर कारवाईची किरीट सोमय्यांनी केली मागणी

भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या जणू काही हात धुऊन मागे लागलेले आहेत, असे दिसून येते. या सरकार मधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेले कथित भ्रष्टाचार उघड करण्यासाठी सोमय्या रोजच पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे आरोप करीत आहेत. आता त्यांच्या निशाण्यावर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटीलही आले आहेत. शिवसेना […]