गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

इन्कम टॅक्सची मोठी धाड! 100 कोटींचा काळापैसा उघड; 16 बँक खाती सील, कोट्यावधींचे दागिणे आणि रोकड हस्तगत

गुजरातमध्ये आयकर विभागाने एका कंपनीवर छापे टाकून जवळपास 100 कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचा शोध लावला. याबाबतची माहिती सीबीटीडीने रविवारी दिली. आयकर विभागाने रसायनांची निर्मिती आणि रियल इस्टेटमध्ये कार्यरत एका कंपनीवर नुकतीच छापेमारी केली होती. या छाप्यात 100 कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेचा शोध लागला आहे. 18 नोव्हेंबर रोजी वापी, सरिगम (वलसाड जिल्हा), सिल्वासा आणि मुंबईतील जवळपास 20 परिसरात विभागाने झाडाझडती घेतली होती.

बेनामी गुंतवणुकीचे पुरावे असलेले दस्तावेज, डायरी, डिजिटल डेटा दर्शिवणारे सर्व दस्तावेज जप्त केले असल्याची माहिती सीबीडीटीने दिली. या सर्व पुराव्यांवरून कर चुकवेगिरी झाल्याचेही उघड झाले आहे. उत्पादन लपविणे, खरेदी वाढविण्यासाठी पुरवठ्याविना बनावट पावत्या, बनावट जीएसटी क्रेडिटचा लाभ, बनावट कमीशन खर्चाचा दावाही कंपनीने केल्याचा आरोप सीबीडीटीने केला आहे.

यासोबतच रोख व्यवहार आणि अचल मालमत्तेत गुंतवणूक तसेच रोख कर्जासंबंधित सर्व दस्तावेजही विभागाने जप्त केले आहेत. याशिवाय छापेमारीत 2.5 कोटी रोख, 1 कोटी रुपयांचे दागिणे जप्त करण्यात आले असून 16 बँक खाती गोठविण्यात आल्याची माहितीही सीबीडीटीने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *